Friday, June 10, 2016

TATA Balanced Fund

TATA Balanced Fund - BALANCED CATEGORY FUND 

संतुलित (Balanced) विभागातील हि एक अतिशय चांगली कामगिरी करणारी योजना आहे. हि योजना 

८ ऑक्टोबर १९९५ रोजी गुंतवणुकीसाठी सुरु झाली, एक सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करणारी योजना आहे. सातत्याने गुंतवणुकीवर कमी जोखीम असूनही उत्तम परतावा या योजनेतून मिळालेला आहे. गेल्या २१ वर्षात मिळालेला वार्षिक चक्रवाढ पद्धतीने मिळालेला परताव्याचा दर १६.४६% एवढा आहे तोही करमुक्त. परताव्यातील अस्थिरता (Volatility) हि तुलनेने फारच कमी आहे, कारण कोणत्याही संतुलित (Balanced) तुलनेने कमी जोखीम असते.  अशा योजनेत गुंतवणूक करताना ती ५ किंवा अधिक मुदतीसाठीच असली पाहिजे. जी व्यक्ती म्युचुअल फुंड मध्ये प्रथमच गुंतवणूक करणार असेल त्यांनी या प्रकारचे संतुलित योजनेत गुंतवणूक करून सुरुवात करावी व एक वर्ष अनुभव घेतल्यावर समभाग आधारित योजनेत गुंतवणूक करावी असा मी सल्ला देतो. गुंतवणूक निरनिराळ्या क्षेत्रामधील फक्त मोठ्या कंपन्यांचे शेअर्स मध्येच केली जाते. या योजनेत दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करण्याची ताकद आहे.


योजनेची माहिती:
हि योजना संतुलित (Balanced)प्रकारात मोडते. या योजनेचे एक वैशिष्ठ्य असे सांगता येईल कि या योजनेतील निधी साधारण पणे ७०% शेअर्स मध्ये व उर्वरित ३०% निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनात गुंतवला जातो. हि योजना ओपन एंड प्रकारातील असल्यामुळे केव्हाही पैसे गुंतवता येतात किंवा काढताही येतात. या योजनेतील गुंतवणुकीचे ९/६/२०१६ रोजी एकूण मूल्य रु.६०६७ कोटी एवढे आहे, हे गुंतवणूकदारांचे या योजनेवर असलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे. सध्या अनेक कंपन्यांचे शेअर्सचा भाव हा त्याच्या उच्चतम पातळीपेक्षा २५% ते ६०% एवढा कमी झालेला आहे. अर्थशास्त्राचा एक नियम आहे ज्याची किंमत वर जाते ती कालांतराने कमी होणारच आणि ज्याची किंमत कमी होते ती कालांतराने वाढणारच. हा नियम चांगल्या कंपन्यांचे शेअर्सचे भावाला लागू पडतो. दुसरे म्हणजे प्रत्येक शेअर तेजीच्या कालखंडामध्ये एक नवीन उच्चतम पातळी निर्माण करतो, त्यानंतर त्याचा भाव खाली येतो व परत पुढच्या मोठ्या तेजीत तो मागची उच्च पातळी ओलांडून नवीन उच्च पातळी तयार करतो. या योजनेत दर महा एस.आय.पी. माध्यमातून नियमित ठराविक रकमेची गुंतवणूक करावी किंवा एफ.डी. प्रमाणे समजून (किमान ७ वर्षे किंवा अधिक काळासाठी) एकरकमी गुंतवणूक करावी. 

योजनेचे वैशिष्ठ्य:
या योजनेने सलग गेली ७ वर्षे बाजारातील चढ उतारावर मात करत सातत्याने गुंतवणुकीवर अतिशय चांगला परतावा दिलेला आहे.  कोणत्याही चांगल्या इक्विटी योजने प्रमाणेच परतावा दिलेला असून जोखीम हि तुलनेने कमी आहे. गेल्या ३ वर्षातील व ५ वर्षातील परतावा हा बेंचमार्क पेक्षा ७% ते १०% जास्त आहे, हा अप्रतिमच म्हटला पाहिजे. या योजनेत ७५% इक्विटी व २५% डेब्ट असे प्रमाण जास्तकरून ठेवले जाते. शेअर खरेदी करताना त्याची किंमत व त्या किमतीवर किती परतावा भविष्यात मिळू शकेल (GARP - Growth at reasonable price) या तत्वाचा वापर करून गुंतवणूक केली जाते. प्रत्येक क्षेत्रातील आघाडीच्या ४-५ कंपन्या निवडल्या जातात  कोणत्याही शेअर मध्ये ४ ते ५% एवढीच गुंतवणूक केली जाते आणि पोर्टफोलिओ मध्ये एका वेळी साधारण ५५ ते ६५ एवढ्याच कंपन्यांचे शेअर्स ठेवले जातात. डेब्ट विभागात सरकारी रोखे व चांगले पतमापन असणाऱ्या रोख्यातच गुंतवणूक केली जाते.  यामुळेच हि योजना सदा सर्वकाळ गुंतवणुकीसाठी उत्तम आहे.


योजनेचे उदिष्ट:

वेगवेगळ्या क्षेत्रातील  अनेक कंपन्यांचे शेअर्स मध्ये व बॉंडस, अल्प व दीर्घ मुदतीचे कर्ज रोखे, व मनी मार्केट मध्ये गुंतवणूक करून गुंतवणुकीत जास्तीत जास्त मूल्य वृद्धी करणे व नियमित दर वर्षी लाभांश देणे हे ह्या योजनेचे उदिष्ट आहे.

फंड  मॅनेजर: 
या योजनेचे गुंतवणुकीचे नियोजन/व्यवस्थापन हे श्री. अखिल मित्तल आणि श्री प्रदीप गोखले हे करत असून त्यांना निधी व्यवस्थापन करण्याचा चांगला अनुभव आहे, म्युचुअल फंड उद्योग जगतात हे एक नावाजलेले चांगले फंड मॅनेजर्स म्हणून ओळखले जातात. 

योजनेची मागील कामगिरी:
हि योजना ८ ऑक्टोबर १९९५ रोजी सुरु झाली. तेव्हा पासून या योजनेतून वार्षिक सरासरी १६.४६चक्रवाढ दराने परतावा मिळालेला आहे. दिनांक ०९/०६/२०१६ रोजी या योजनेची एन.ए.व्ही. रु.१७१.४५ एवढी आहे म्हणजेच ज्यांनी या योजनेत सुरुवातीला एक रकमी रु.एक लाख गुंतवले होते त्या गुंतवणुकीचे दिनांक ९/०६/२०१६ रोजी मूल्य रु.१७.१४ लाखा पेक्षा जास्त झालेले आहे. तसेच ज्यांनी या योजनेत सुरुवातीपासून दर महा रु.५०००/- ची गुंतवणूक केलेली आहे त्यांची एकूण गुंवणूक रु.१२.२५ लाख एवढी करून झालेली असून दिनांक ०९/०६/२०१६ या गुंतवणुकीचे मूल्य रु.१ कोटी ३ लाख ७५ हजार एवढे झालेले आहे.

आता काही आकडेवारी बघा: 
Basic Details
Fund House:Tata Mutual Fund
Launch Date:Oct 08, 1995
Benchmark:Crisil Balanced Fund Aggressive
Riskometer:Moderately High
Risk Grade:Average
Return Grade:High
Turnover:84%
Type:Open-ended
Investment Details
Return since Launch:16.46%
Minimum Investment (R)5,000
Minimum Addl Investment (R)1,000
Minimum SIP Investment (R)500
Minimum No of Cheques12
Minimum Withdrawal (R)1,000
Minimum Balance (R)-
Exit Load (%)1% for redemption within 365 days
Performance
YTD1-Month3-Month1-Year3-Year5-Year10-Year
Fund1.252.987.914.3420.2815.6616.14
VR Balanced3.243.487.553.1710.498.0510.02
Category2.692.777.345.7516.1211.7411.89
Rank within Category684343611411
Number of funds in category81868379552923
As on Jun 09, 2016 Source: Valueresearchonline.com

योजनेची कामगिरी 
Best & Worst PerformanceBest (Period)Worst (Period)
Month28.00  (May 11, 2009 - Jun 10, 2009)-25.07  (Sep 24, 2008 - Oct 24, 2008)
Quarter56.94  (Mar 09, 2009 - Jun 10, 2009)-33.70  (Feb 23, 2000 - May 24, 2000)
Year120.81  (Jan 04, 1999 - Jan 04, 2000)-47.16  (Jan 14, 2008 - Jan 13, 2009)
Risk Measures (%)MeanStd DevSharpeSortinoBetaAlpha
Fund18.9813.261.051.760.988.88
VR Balanced10.1812.350.410.77--
Category15.2311.630.871.500.865.74
Rank within Category142021212116
Number of funds in category626262626262
As on May 31, 2016
Trailing Returns (%)YTD1-Day1-W1-M3-M6-M1-Y3-Y5-Y7-Y10-Y
Fund1.25-0.270.332.987.914.854.3420.2815.6616.1916.14
VR Balanced3.24-0.68-0.123.487.556.853.1710.498.058.2410.02
Category2.69-0.250.432.777.345.375.7516.1211.7412.2011.89
Rank within Category6848464343486114131
Number of funds in category8186868683817955292423
As on Jun 09, 2016 Source: Valueresearchonline.com

समभाग  (इक्विटी) पोर्टफोलिओ 
Top Equity Holdings
CompanySectorPE3Y High3Y Low% Assets
 HDFC BankFinancial22.885.262.813.89
 InfosysTechnology19.803.070.002.88
 Yes BankFinancial17.482.100.002.04
 Power Grid Corp.Energy13.442.550.001.98
 HCL TechnologiesTechnology14.314.711.951.95
 Sun Pharmaceutical Inds.Healthcare37.914.050.811.89
 Kotak Mahindra BankFinancial39.722.230.001.85
 Zee Entertainment Ent.Services43.221.980.001.83
 Glenmark Pharma.Healthcare30.192.620.001.69
 Asian PaintsChemicals55.292.430.001.62
  Tata MotorsAutomobile12.152.070.001.55
 HDFCFinancial19.094.280.761.51
 Ashok LeylandAutomobile28.451.550.001.44
 Shree CementConstruction103.763.521.231.41
 Indusind BankFinancial29.161.620.001.36
 State Bank of IndiaFinancial13.321.390.001.35
 Aditya Birla Fashion and RetailServices0.001.630.001.30
 Axis BankFinancial15.474.190.931.27
 Tata Consultancy ServicesTechnology20.864.050.001.27
 Sadbhav EngineeringConstruction0.002.700.251.15
  Hindustan UnileverFMCG46.371.600.001.12
 Strides ShasunHealthcare48.181.440.001.10
 Kajaria CeramicsConstruction41.361.390.001.08
 Ultratech CementConstruction40.241.180.001.06
  Aditya Birla NuvoDiversified7.423.020.001.04

डेब्ट पोर्टफोलिओ

Top Debt Holdings
CompanyInstrumentCredit Rating1Y Range% Assets
  7.68% GOI 2023GOI SecuritiesSOV0.00 - 6.616.61
  7.61% GOI 2030GOI SecuritiesSOV0.00 - 1.661.66
 9.35% Piramal Enterprises 2017DebentureAA0.00 - 1.971.65
  7.16% GOI 2023Central Government LoanSOV0.00 - 2.081.61
  8.15% GOI 2026Central Government LoanSOV0.00 - 1.441.44
  7.35% GOI 2024Central Government LoanSOV0.00 - 1.381.38
 7.88% GOI 2030GOI SecuritiesSOV0.00 - 6.461.00
 8.39% HDFC 2019DebentureAAA0.00 - 1.170.99
 Axis Bank 2016Certificate of DepositA1+0.00 - 0.850.82
 Axis Bank 2016Certificate of DepositA1+0.00 - 0.850.82
 8.28% GOI 2027Central Government LoanSOV0.68 - 2.230.68
  8.4% ICICI Bank 2026DebentureAAA0.00 - 0.490.49
 8.24% GOI 2027Central Government LoanSOV0.46 - 1.120.46
 8.17% GOI 2044Central Government LoanSOV0.00 - 0.500.43
 8.08% GOI 2022Central Government LoanSOV0.42 - 1.330.42
 8.9% Reliance Jio Infocomm 2020DebentureAAA0.00 - 0.490.42
 8.18% Export-Import Bank 2025BondsAAA0.00 - 0.480.41
 Oriental Bank of Com. 2016Certificate of DepositA1+0.00 - 0.430.41
 Dena Bank 2016Certificate of DepositA1+0.00 - 1.320.41
 Ford Credit India 58-D 23/06/2016Commercial PaperA1+0.00 - 0.420.41
 8.13% GOI 2045GOI SecuritiesSOV0.00 - 1.270.36
  8.4% GOI 2024Central Government LoanSOV0.26 - 7.640.26
 9.58% Indiabulls Housing Finance 2017DebentureAAA0.25 - 0.400.25
  HDFC 2017DebentureAAA0.00 - 0.250.25
 9.1368% Shriram City Union Finance 2016DebentureAA-0.00 - 0.490.25
   Indicates an increase or decrease or no change in holding since last portfolio
 Indicates a new holding since last portfolio
As on May 31, 2016
*As on Apr 30, 2016 Source: Valueresearchonline.com

वरील पोर्टफोलिओ पाहिल्यास तुमच्या लक्षात येईलच कि अनेक चांगल्या कंपन्यांचे शेअर्स  या पोर्टफोलिओ मध्ये आहेत जे भविष्यात उत्तम परतावा देण्याची क्षमता असणारे आहेत, तसेच डेब्ट पोर्टफोलिओ मध्ये सरकारी रोखे व उच्च श्रेणीचे कर्ज रोख्यांचा समावेश आहे.

सध्याची कामगिरी:
या योजनेतून गेल्या ३ वर्षात सरासरी २०.२८% वार्षिक दराने उत्पन्न मिळालेले आहे, मात्र याच काळात VR Balanced Index परतावा १०.२९% होता. आजचे तारखेला हि या विभागातील एक चांगली योजना आहे.



योजनेतील जोखीम:
ह्या योजनेतील ७०% रक्कम हि शेअर बाजारात  गुंतवली जात असल्यामुळे या योजनेत केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य शेअर बाजारातील मधील चढ उतारा नुसार कमी किंवा जास्त होऊ शकते. तसेच उर्वरित गुंतवणूक कि कायम उत्पन्न साधनात गुंतवली जाते यामुळेच या योजनेतील जोखीम तुलनेने कमी होते. याच कारणामुळे या योजनेत गुंतवणूक करताना दीर्घ मुदतीसाठीच (किमान ३ ते ५ वर्षे) करावी.  जरी योजनेत केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य बाजार खाली आल्यास कमी झाले तरी काळजी करू नये कारण दीर्घ मुदतीत अशा प्रकारचे योजनेतून उत्तम परतावा (सरासरी १४% ते २०% या दरम्याने) मिळालेला आहे. 

या योजनेत गुंतवणूक कोणी करावी:
ज्यांना कमीत कमी जोखम पत्करून चांगला व करमुक्त लाभ मिळावा असे वाटते, शेअर तेजीचे कालखंडात शेअर बाजारातील जास्तीचा फायदा मिळावा व मंदीचे काळात निश्चित उत्पन्न साधनातील गुंतवणुकीचा लाभ मिळावा असे वाटते त्यांनी या योजनेत गुंतवणूक करावी. तसेच ज्या व्यक्ती म्युचुअल फंडात प्रथमच गुंतवणूक करणार असतील त्यांनी या योजनेत गुंतवणूक करून त्यांची गुंतवणुकीची सुरुवात करावी म्हणजे बाजारातील जोखमीचा थोडा अंदाज येईल, किमान सहा महिने ते एक वर्ष या योजनेतील गुंतवणुकीचा अनुभव घेऊन झाल्यावर बाजारातील अन्य जास्त जोखमीचे योजनेत गुंतवणूक करावी. आणि बाजारातील चढ उतारावर मात करण्यासाठी शक्यतो एस.आय.पी. चे माध्यमातून गुंतवणूक करावी, असे केल्याने आपण बाजारातील तेजी तसेच मंदीचे काळात गुंतवणूक करत राहतो ज्यामुळे गुंतवणुकीची सरासरी होते व जास्त युनिट प्राप्त होतात.  तेजीचे काळात शेअर बाजार तुमच्या गुंतवणुकीवर जास्त परतावा देईल व मंदीचे काळात निश्चित उत्पन्न साधनातील गुंतवणुक तुम्हाला नुकसान होण्यापासून रोखून धरेल. या योजनेत तुम्ही १३% ते १८% एवढा परतावा मिळवू शकता.
या योजनेत कोणी गुंतवणूक करू नये?
ज्यांना त्यांचे गुंतवणुकीचे मूल्य थोडे जरी कमी झाले तरी रक्तदाब वाढतो, झोप लागत नाही, बैचैन व्हायला होते, शेअर बाजाराची भीती वाटते अशा व्यक्तींनी या योजनेत गुंतवणूक न केलेलीच बरे.
गुंतवणूक केल्यावर काय करावे?
गुंतवणूक करून झाल्यावर उगाचच रोजच्या रोज आपल्या गुंतवणुकीचे मूल्य पहात बसू नये. कधीतरी सहा महिने वर्षाने जेव्हा बाजार (सेन्सेक्स/निफ्टी) वाढलेला असेल तेव्हाच आपल्या गुंतअनुकीचे मूल्य पाहावे. वर्षांचा नव्हे तर दश्कांचाच विचार करावा.

तुम्हाला म्युचुअल फंडाच्या या योजनेत गुंतवणूक करावयाची आहे काय?
  
जर आपणास प्रथमच म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर खालील तिन्ही फॉर्म आपले संगणकावर उतरवून घ्या, यातील CAN फॉर्म मध्ये तुमची संपूर्ण माहिती भरा आणि मग प्रिंट काढा त्यावर पान क्रमांक ४ वर सही साठी असलेल्या पहिल्या चौकोनात आपली सही करा. KYC फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती भरा आणि मग प्रिंट काढा, फोटो चिकटवा आणि अर्धी बाहेर व अर्धी फोटोवर अशी एक सही करा, दुसरी सही खाली सहीसाठी चौकोन आहे त्यामध्ये करा, PayEezz Mandate ह्या फॉर्मची प्रिंट काढा, XX (दोन फुल्या केलेल्या) ठिकाणी सही करा. आता सोबत ज्या बँके मार्फत तुम्हाला गुंतवणूक इ. व्यवहार करावयाचे असतील त्या बँकेचा चेक कॅन्सल करून जोडा तसेच तुमच्या PAN कार्ड व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत स्वसाक्षांकित करून जोडा. आता तिन्ही फॉर्म व कागदपत्रे मला खालील पत्त्यावर पाठवून द्या.  यानंतर मला (९४२२४३०३०२) फोन करा. फोनवर आपण चर्चा करून तुम्हाला गुंतवणुकीसाठी योग्य असणारी म्युचुअल फंडाची योजना आपण ठरवू. या नंतर ऑनलाईन एस.आय.पी. किंवा एकरकमी गुंतवणूक म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत आपण करू शकतो, तुम्हाला फक्त तुमच्या बँक खात्यात पैसे शिल्लक ठेवावयास हवेत. हि प्रोसेस एकदाच केल्यावर नंतर कोणतेही कागदपत्रे, चेक, सही वगैरे काहीच लागणार नाही. फॉर्म भरताना तुम्हाला काही मदत हवी असल्यास मला फोन करून विचार.  जर तुम्ही यापूर्वी गुंतवणूक केली असेल व जर तुम्हालाही हि सुविधा हवी असेल तर खालील तिन्ही फॉर्म भरून सोबत बँकेचा कॅन्सल चेक, PAN कार्ड व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत स्वसाक्षांकित करून जोडा. असे केल्याने तुम्हाला एम.एफ. युटीलिटी या प्लॅटफॉर्म च्या सर्व सुविधेचा लाभ घेता येईल, ज्यामध्ये ऑनलाईन गुंतवणूक करणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत पैसे वर्ग करणे, तपशिलात बदल करणे, बँक खात्यात बदल करणे, पत्ता बदलणे आदी साऱ्या गोष्टी ऑनलाईन किंवा मला फोन करूनही करता येतील. नवीन एस.आय.पी. सुरु करता येईल. सर्व गुंतवणुकीसाठी एकच खाते नंबर मिळेल. आणि महत्वाचे म्हणजे सर्व काही पेपरलेस करता येईल.


वरील सर्व फॉर्म व कागदपत्रे खाली पत्त्यावर पोस्ट अथवा कुरिअरने पाठवून द्या:
ठाकूर फायनन्शिअल सर्व्हिसेस 
२७५, मनीषा, आय.सी.आय.सी.आय. बँके शेजारी, कावीळतळी, चिपळूण-४१५६०५ जि. रत्नागिरी.

पुढील सर्व कारवाई आम्ही पूर्ण करून तुमचे रजिस्ट्रेशन झाले कि तुम्हाला इमेलने कळवू. गुंतवणूक करून झाल्यावर लॉगीन आय.डी. व पासवर्ड इमेलने कळवू याचा वापर करून तुम्ही तुमची म्युचुअल फंडातील सर्व गुंतवणूक एकाच ठिकाणी पाहू शकाल, तसेच नवीन गुंतवणूक करणे, पैसे काढणे आदी साऱ्या गोष्टी ऑनलाइन करू शकाल.

आमची मराठी वेबसाईट www.mutualfundmarathi.com अवश्य भेट द्या.

No comments:

Post a Comment