Thursday, June 9, 2016

Birla SL Cash Manager - Liquid Fund

Birla SL Cash Manager Fund - Liquid (debt) CATEGORY FUND

Liquid (तरल) या विभागातील हि चांगली कामगिरी करणारी योजना आहे. लिक्विडीटी म्हणजे तरलता हे या प्रकारातील योजनेचे एक महत्वाचे वैशिष्ठ्य असते. अश्या योजनेत तुम्ही केव्हाही गुंतवणूक करावी, कितीही दिवसासाठी करावी, अशा योजनेतील निधीची गुंतवणूक हि फक्त अल्प मुदतीच्या कर्ज रोखे, मनी मार्केट साधने, अल्प मुदतीचे पेपर्स इ. साधारणपणे ९० दिवसाचे मुदतीचे निश्चितउत्पन्न (व्याज) देणाऱ्या गुंतवणूक साधनातच केली जाते. यामुळे अशा प्रकारचे योजनेत शेअर बाजाराचे चढ उताराची कोणतीही जोखीम नसते. सर्वसाधारणपणे अशा योजनेची एन.ए.व्ही. रोजच वाढत असते. अश्या प्रकारातील योजनेत अगदी ७ दिवस ते काही वर्षे अशा कोणत्याही कालावधीसाठी गुंतवणूक करावी.


योजनेची माहिती:
बिर्ला सन लाईफ कॅश मॅनेजर फंड हि योजना १४ मे १९९८ रोजी गुंतवणुकीसाठी खुली झाली. या योजनेत कितीही काळासाठी गुंतवणूक करावी. हि योजना ओपन एंड प्रकारातील असल्यामुळे केव्हाही पैसे गुंतवता येतात किंवा काढताही येतात. या योजनेतील गुंतवणुकीचे ०८/०६/२०१६ रोजी एकूण मूल्य रु.६९५२/- कोटी एवढे आहे. अशा योजनेत केव्हाही एक रकमी गुंतवणूक करावी. तसेच या योजनेत एस.आय.पी. व्दारे सुद्धा गुंतवणूक करता येते. या योजनेत एन्ट्री लोड किंवा एक्सझीट लोड नाही, या मुळे कितीही (अल्प किंवा दीर्घ) मुदतीसाठी यात गुंतवणूक करावी. बँकेचे बचत खाते व अल्प मुदतीच्या एफ.डी. हा उत्तम पर्याय आहे. 

योजनेचे उदिष्ट:

वेगवेगळ्या क्षेत्रातील अल्प मुदतीच्या निश्चितउत्पन्न (व्याज) देणाऱ्या अनेक कंपन्यांचे, बँक आणि सरकारी रोखे, मध्ये गुंतवणूक करून गुंतवणुकीत जास्तीत जास्त मूल्य वृद्धी करणे व ज्यांना लाभांश हवा असतो त्यांना नियमितपणे चांगला लाभांश देता यावा हा आहे हे ह्या योजनेचे उदिष्ट आहे. 

गुंतवणुकीचे पर्याय 
म्युचुअल फंडाचे सर्वच खुल्या प्रकारातील योजनेत ग्रोथ, लाभांश हे दोन प्रमुख पर्याय असतात. ग्रोथ पर्यायात गुंतवणुकीचे मूल्य बाजारातील चढ उतारानुसार वाढत असते. लाभांश पर्यायात लाभांश पुनर्गुंतवणूक व लाभांश देय असे दोन पर्याय असतात. लाभांश पुनर्गुंतवणूक मध्ये लाभाश जाहीर झाल्यानंतर तो परत याच योजनेत गुंतवला जातो व देय लाभांश पर्यायामध्ये तो जेव्हा जाहीर होतो तेव्हा गुंतवणूकदाराला दिला जातो.

फंड  मॅनेजर: 
या योजनेचे गुंतवणुकीचे नियोजन/व्यवस्थापन हे श्री. कौस्तुभ गुप्ता व सुनयना हे करत आहेत. त्यांना निधी व्यवस्थापन करण्याचा चांगला अनुभव आहे, म्युचुअल फंड उद्योग जगतात हे एक नावाजलेले चांगले फंड मॅनेजर्स म्हणून ओळखले जातात. 

योजनेची मागील कामगिरी:
दिनांक ०८/०६/२०१६ रोजी या योजनेची एन.ए.व्ही. रु.३६८.६५ एवढी आहे म्हणजेच ज्यांनी या योजनेत सुरुवातीला (१४ मे १९९८) एक रकमी रु.एक लाख गुंतवले होते त्या गुंतवणुकीचे दिनांक ८/०६/२०१६ रोजी मूल्य रु.३.६८ लाखा पेक्षा जास्त झालेले आहे. या योजनेत दैनिक लाभांश, साप्ताहिक लाभांश, मासिक लाभांश, वार्षिक लाभांश किंवा ग्रोथ असे पर्याय आहेत. या योजनेत तुम्ही एस.आय.पी. सुद्धा करू शकता व ज्या आधारे तुम्ही तुमचा आकस्मिक खर्चासाठी लागणाऱ्या रकमेची तरतूद करू शकता. या योजनेतून पैसे काढण्याची सूचना जर दुपारी २ वाजण्यापूर्वी दिली तर दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजण्यापूर्वी पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतात.

सध्याची कामगिरी:
या योजनेतून गेल्या ३ वर्षात सरासरी ८.५९% वार्षिक दराने उत्पन्न मिळालेले आहे. आजचे तारखेला हि या विभागातील एक  चांगली योजना आहे.

या योजनेबाबत काही महत्वाची आकडेवारी : 
Basic Details
Fund House:Birla Sun Life Mutual Fund
Launch Date:May 14, 1998
Benchmark:Crisil Short-Term Bond
Riskometer:Moderately Low
Risk Grade:Above Average
Return Grade:Below Average
Type:Open-ended
Investment Details
Return since Launch:8.55%
Minimum Investment (R)5,000
Minimum Addl Investment (R)1,000
Minimum Withdrawal (R)500
Minimum SWP Withdrawal (R)-
Minimum Balance (R)-
Exit Load (%)0
Performance
YTD1-Month3-Month1-Year3-Year5-Year10-Year
Fund3.700.712.368.138.598.75-
CCIL T Bill Liquidity Weight2.080.401.215.035.385.46-
Category3.730.742.378.368.959.03-
Rank within Category7487731009646-
Number of funds in category12212212212211755-
As on Jun 08, 2016Source: Valueresearchonline.com

योजनेची  कामगिरी 
Best & Worst PerformanceBest (Period)Worst (Period)
Month1.37  (Aug 30, 2013 - Oct 01, 2013)-0.19  (Jun 24, 2013 - Jul 24, 2013)
Quarter2.98  (Jul 24, 2013 - Oct 23, 2013)0.88  (Dec 17, 09 - Mar 18, 2010)
Year10.09  (Jul 24, 2013 - Jul 24, 2014)4.16  (Jun 24, 09 - Jun 24, 2010)
Risk Measures (%)MeanStd DevSharpeSortinoBetaAlpha
Fund8.280.714.525.760.923.05
CCIL T Bill Liquidity Weight*------
Category8.610.755.939.820.803.40
Rank within Category1135611312545113
Number of funds in category162162162162162162
As on May 31, 2016
Trailing Returns (%)YTD1-Day1-W1-M3-M6-M1-Y3-Y5-Y7-Y10-Y
Fund3.700.040.170.712.364.078.138.598.75--
CCIL T Bill Liquidity Weight2.080.020.100.401.212.365.035.385.46--
Category3.730.030.180.742.374.208.368.959.03--
Rank within Category7438858773941009646--
Number of funds in category12212212212212212212211755-
As on Jun 08, 2016 Source: Valueresearchonline.com



योजनेच्या गुंतवणुकीचा तपशील (पोर्टफोलिओ)
Top Holdings
CompanyInstrumentCredit Rating1Y Range% Assets
  Vijaya Bank 2017Certificate of DepositA1+0.00 - 4.003.99
 IDBI Bank 2016Certificate of DepositA1+0.00 - 4.423.76
  8.55% Reliance Jio Infocomm 2018DebentureAAA0.00 - 4.193.72
 8.04% SIDBI 2019DebentureAAA0.00 - 3.472.91
 SD Corporation 2017DebentureAA+0.00 - 3.402.91
 8.85% Tata Capital Financial Services 2018DebentureAA+0.00 - 2.902.90
  Hindustan Zinc 198-D 28/10/2016Commercial PaperA1+0.00 - 2.812.81
 Tata Realty and Infrastructure 365-D 25/11/2016Commercial PaperA1+0.00 - 3.272.78
 9% Tata Capital Financial Services 2017DebentureAA+0.00 - 3.112.62
 Indiabulls Housing Finance 2018DebentureAAA0.00 - 2.862.41
 8.46% Maharashtra State 2019State Development LoanSOV0.00 - 2.222.22
 9.65% Shriram Transport Finance 2016DebentureAA+0.00 - 2.331.96
  9.3% Power Finance Corp. 2017DebentureAAA0.00 - 1.841.84
 8.28% SIDBI 2019Bonds/DebenturesAAA0.00 - 2.181.83
 8.9% Tata Capital Financial Services 2018DebentureAA+1.63 - 2.161.82
 8.81% Sundaram Finance 2017DebentureAA+1.62 - 2.161.82
  L&T Infrastructre Finance 180-D 06/09/2016Commercial PaperA1+0.00 - 1.781.78
 4% Indiabulls Housing Finance 2019DebentureAAA1.39 - 1.911.63
 10.95% Shriram Transport Finance 2016DebentureAA+0.00 - 1.911.60
 8.46% Rajasthan State 2019State Development LoanSOV0.00 - 1.481.48
 8.12% Power Finance Corp. 2017BondsAAA0.00 - 1.731.46
 9.43% Piramal Enterprises 2017DebentureAA0.00 - 1.731.45
 8.9% Cholamandalam Invest. & Fin. 2017DebentureAA0.00 - 1.721.45
 Tata Realty and Infrastructure 364-D 03/11/2016Commercial PaperA1+0.00 - 1.641.40
 Shapoorji Pallonji Co. 329-D 15/12/2016Commercial PaperA1+0.00 - 1.621.39
   Indicates an increase or decrease or no change in holding since last portfolio
 Indicates a new holding since last portfolio
As on May 31, 2016
*As on Apr 30, 2016Source: Valueresearchonline.com

वरील पोर्टफोलिओ पाहिल्यास तुमच्या लक्षात येईलच कि अनेक चांगल्या निश्चित उत्पन्न (व्याज) देणाऱ्या कर्ज रोखे आधी साधंत गुंतवणूक केलेली आहे. 

योजनेतील जोखीम:
ह्या योजनेतील जवळपास शून्य जोखीम असते. व्याजातील बदल, क्रेडीट रेटिंग, अवसानात जाणे अशी जोखीम कर्जरोखे आधारित साधनात असते, तीही अश्या योजनेत अगदी नगण्य असते कारण अश्या योजनेतील गुंतवणूक कि साधारणपणे ९० दिवसात मुदत पूर्ती होणार्या कर्जरोखे आदी साधनात केली जाते.  आत्ता पर्यंत एकदाच एके दिवशी अशा योजनेत एन.ए.व्ही.ची किंमत कमी झालेली आहे, ती सुद्धा मार्क टू मार्केट मुल्यांकनामुळे (सेबी चे आदेशानुसार).

या योजनेत गुंतवणूक कोणी करावी:
या योजनेत मुख्यत्वेकरून ज्यांना अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करावयाची असेल, ज्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करणे जोखमीचे वाटत असेल, ज्यांना बँक एफ.डी. पेक्षा जास्त परतावा कमी काळात हवा असेल, ज्यांना बँक एफ.डी. मध्ये ती.डी.एस. कापला जातो तसा कापला जाऊ नये असे वाटते त्यांनी या योजनेत गुंतवणूक करावी.

या योजनेत गुंतवणूकीचे अन्य लाभ:
१) टी.डी.एस. कापला जात नाही.
२) तीन वर्षांपेक्षा जास्त काळासाठी गुंतवणूक केली तर इंडेक्ससेशन चा लाभ मिळून कर बचत होते. अत्यंत नगण्य किंवा शून्य कर दायित्व येते.
३) कितीही काळासाठी गुंतवणूक करता येते.
४) रोजच्या रोज गुंतवणुकीचे मूल्य वाढत जाते.
५) बँक सेव्हिंग खात्याला उत्तम पर्याय.
६) बँक ए.डी. ला उत्तम पर्याय, पैसे केव्हाही काढले तरी कोणतीही वजावट होत नाही.

तुम्हाला म्युचुअल फंडाच्या या योजनेत गुंतवणूक करावयाची आहे काय?
जर आपणास प्रथमच म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर खालील तिन्ही फॉर्म आपले संगणकावर उतरवून घ्या, यातील CAN फॉर्म मध्ये तुमची संपूर्ण माहिती भरा आणि मग प्रिंट काढा त्यावर पान क्रमांक ४ वर सही साठी असलेल्या पहिल्या चौकोनात आपली सही करा.  KYC फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती भरा आणि मग प्रिंट काढा, फोटो चिकटवा आणि अर्धी बाहेर व अर्धी फोटोवर अशी एक सही करा, दुसरी सही खाली सहीसाठी चौकोन आहे त्यामध्ये करा, PayEezz Mandate ह्या फॉर्मची प्रिंट काढा, XX (दोन फुल्या केलेल्या) ठिकाणी सही करा. आता सोबत ज्या बँके मार्फत तुम्हाला गुंतवणूक इ. व्यवहार करावयाचे असतील त्या बँकेचा चेक कॅन्सल करून जोडा तसेच तुमच्या PAN कार्ड व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत स्वसाक्षांकित करून जोडा. आता तिन्ही फॉर्म व कागदपत्रे मला खालील पत्त्यावर पाठवून द्या.  यानंतर मला (९४२२४३०३०२) फोन करा. फोनवर आपण चर्चा करून तुम्हाला गुंतवणुकीसाठी योग्य असणारी म्युचुअल फंडाची योजना आपण ठरवू. या नंतर ऑनलाईन एस.आय.पी. किंवा एकरकमी गुंतवणूक म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत आपण करू शकतो, तुम्हाला फक्त तुमच्या बँक खात्यात पैसे शिल्लक ठेवावयास हवेत. हि प्रोसेस एकदाच केल्यावर नंतर कोणतेही कागदपत्रे, चेक, सही वगैरे काहीच लागणार नाही. फॉर्म भरताना तुम्हाला काही मदत हवी असल्यास मला फोन करून विचार.  जर तुम्ही यापूर्वी गुंतवणूक केली असेल व जर तुम्हालाही हि सुविधा हवी असेल तर खालील तिन्ही फॉर्म भरून सोबत बँकेचा कॅन्सल चेक, PAN कार्ड व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत स्वसाक्षांकित करून जोडा. असे केल्याने तुम्हाला एम.एफ. युटीलिटी या प्लॅटफॉर्म च्या सर्व सुविधेचा लाभ घेता येईल, ज्यामध्ये ऑनलाईन गुंतवणूक करणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत पैसे वर्ग करणे, तपशिलात बदल करणे, बँक खात्यात बदल करणे, पत्ता बदलणे आदी साऱ्या गोष्टी ऑनलाईन किंवा मला फोन करूनही करता येतील. नवीन एस.आय.पी. सुरु करता येईल. सर्व गुंतवणुकीसाठी एकच खाते नंबर मिळेल. आणि महत्वाचे म्हणजे सर्व काही पेपरलेस करता येईल.


वरील सर्व फॉर्म व कागदपत्रे खाली पत्त्यावर पोस्ट अथवा कुरिअरने पाठवून द्या:
ठाकूर फायनन्शिअल सर्व्हिसेस 
२७५, मनीषा, आय.सी.आय.सी.आय. बँके शेजारी, कावीळतळी, चिपळूण-४१५६०५ जि. रत्नागिरी.

पुढील सर्व कारवाई आम्ही पूर्ण करून तुमचे रजिस्ट्रेशन झाले कि तुम्हाला इमेलने कळवू. गुंतवणूक करून झाल्यावर लॉगीन आय.डी. व पासवर्ड इमेलने कळवू याचा वापर करून तुम्ही तुमची म्युचुअल फंडातील सर्व गुंतवणूक एकाच ठिकाणी पाहू शकाल, तसेच नवीन गुंतवणूक करणे, पैसे काढणे आदी साऱ्या गोष्टी ऑनलाइन करू शकाल.

आमची मराठी वेबसाईट www.mutualfundmarathi.com अवश्य भेट द्या.

No comments:

Post a Comment