Sunday, June 5, 2016

Franklin India Prima Plus Fund

Franklin India Prima Plus Fund - MULTI CAP CATEGORY FUND 


फ्रांकलीन म्युचुअल फंड हि एक जागतिक स्तरावर काम करणारी ब्रिटीश मूळ असणारी ए.एम.सी. असून कामगिरीतील सातत्य, विश्वासार्ह्यता हे या फंड हाउसची खासियत आहे. Multi Cap (Diversified) विभागातील हि एक अतिशय चांगली कामगिरी करणारी योजना आहे. मल्टी कॅप योजनेतील गुंतवणूक हि लार्ज कॅप, मिड कॅप व स्मॉल कॅप या तिन्ही प्रकारातील कंपन्यांचे शेअर्स मध्ये गुंतवणूक केली जाते. हि योजना जरी २९ सप्टेंबर १९९४ रोजी जाहीर झाली होती तरी ती १३ डिसेंबर १९९४ रोजी गुंतवणुकीसाठी सुरु झाली, हि सर्वात जुनी जवळपास २२ वर्षे झालेली अतिशय सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करणारी योजना आहे. सातत्याने गुंतवणुकीवर  उत्तम परतावा या योजनेतून मिळालेला आहे. गेल्या २२ वर्षात मिळालेला वार्षिक चक्रवाढ पद्धतीने मिळालेला परताव्याचा दर १९.२५% एवढा आहे तोही करमुक्त आणि म्हणूनच गुंतवणुकीला उत्तम पर्याय असे या योजनेला म्हटले तर चूक होणार नाही. परताव्यातील अस्थिरता (Volatility) हि तुलनेने फारच कमी आहे.  अशा योजनेत गुंतवणूक करताना ती १० किंवा अधिक वर्षांचे अधिक मुदतीसाठीच असली पाहिजे.  गुंतवणूक निरनिराळ्या क्षेत्रामधील  कंपन्यांचे शेअर्स मध्ये केली जाते. याचे प्रमाण ६५% ते ७५% मोठ्या कंपन्यांचे शेअर्स मध्ये, २०% ते ३०% मिड कॅप कंपन्यांचे शेअर्स मध्ये व फक्त ५% छोट्या कंपन्यांचे शेअर्स मध्ये या प्रमाणे केली जाते.  या योजनेत दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करण्याची ताकद आहे.


योजनेची माहिती:
हि योजना Multi Cap (Diversified) प्रकारात मोडते. या योजनेचे एक वैशिष्ठ्य असे सांगता येईल कि या योजनेतील निधी साधारण पणे ६५% ते ७५% मोठ्या कंपन्यांचे शेअर्स मध्ये, २०% ते ३०% मिड कॅप कंपन्यांचे शेअर्स मध्ये व फक्त ५% छोट्या कंपन्यांचे शेअर्स मध्ये या प्रमाणे केली जाते. या योजनेला २२ वर्षे झालेली असल्याने या योजनेने बाजारातील ३ तेजीचे कालखंड तसेच ३ मंदीचे कालखंड अनुभवलेले आहेत. एवढ्या दीर्घ मुदतीसाठी सातत्याने जवळपास २०% परतावा या योजनेतून मिळालेला हीच गोष्ट या योजनेच्या कामगिरीचे मुल्यांकन करावयास पुरेशी आहे. या योजनेचे निधी व्यवस्थापन करताना कंपनीची भविष्यात होणारी मूल्य वृद्धी व पतमापन हि विचारात घेतले जाते. कोणत्याही कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करताना त्या कंपनीची मागील कामगिरी बरोबरच ती कंपनी भविष्यात या स्पर्धेच्या युगात कशी कामगिरी करू शकेल याचा पूर्ण विचार करूनच या योजनेतील निधीच्या गुंतवणुकीचा निर्णय घेतला जातो. २००८ चा किंवा २०११ चा मंदीचा जेव्हा कालखंड होता त्या काळातही या योजनेने अतिशय उत्तम परतावा दिलेला आहे. ह्या योजनेचे निधी व्यवस्थापन हे थोडी कमी जोखीम स्वीकारण्याकडे झुकणारे असल्यामुळेच दीर्घ काळ ह्या योजनेने उत्तम व नियमितपण परताव्याचा विचार करता राखलेला आहे. हि योजना ओपन एंड प्रकारातील असल्यामुळे केव्हाही पैसे गुंतवता येतात किंवा काढताही येतात. या योजनेतील गुंतवणुकीचे ३०/०४/२०१६ रोजी एकूण मूल्य रु.७४२५/- कोटी एवढे आहे, हे गुंतवणूकदारांचे या योजनेवर असलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे. सध्या अनेक कंपन्यांचे शेअर्सचा भाव हा त्याच्या उच्चतम पातळीपेक्षा २५% ते ७५% एवढा कमी झालेला आहे. अर्थशास्त्राचा एक नियम आहे ज्याची किंमत वर जाते ती कालांतराने कमी होणारच आणि ज्याची किंमत कमी होते ती कालांतराने वाढणारच. हा नियम चांगल्या कंपन्यांचे शेअर्सचे भावाला लागू पडतो. दुसरे म्हणजे प्रत्येक शेअर तेजीच्या कालखंडामध्ये एक नवीन उच्चतम पातळी निर्माण करतो, त्यानंतर त्याचा भाव खाली येतो व परत पुढच्या मोठ्या तेजीत तो मागची उच्च पातळी ओलांडून नवीन उच्च पातळी तयार करतो. या योजनेत दर महा एस.आय.पी. माध्यमातून नियमित ठराविक रकमेची गुंतवणूक करावी किंवा एफ.डी. प्रमाणे समजून दीर्घ मुदतीसाठी एकरकमी गुंतवणूक करावी. कामगिरीतील सातत्य हे या योजनेची एक खासियतच आहे. 

योजनेचे उदिष्ट:


वेगवेगळ्या क्षेत्रातील  अनेक कंपन्यांचे शेअर्स मध्ये मध्ये गुंतवणूक करून गुंतवणुकीत जास्तीत जास्त मूल्य वृद्धी करणे व ज्यांना लाभांश हवा असतो त्यांना नियमितपणे चांगला लाभांश देता यावा हा आहे हे ह्या योजनेचे उदिष्ट आहे.

गुंतवणुकीचे पर्याय 
म्युचुअल फंडाचे सर्वच खुल्या प्रकारातील योजनेत ग्रोथ, लाभांश हे दोन प्रमुख पर्याय असतात. ग्रोथ पर्यायात गुंतवणुकीचे मूल्य बाजारातील चढ उतारानुसार वाढत असते. लाभांश पर्यायात लाभांश पुनर्गुंतवणूक व लाभांश देय असे दोन पर्याय असतात. लाभांश पुनर्गुंतवणूक मध्ये लाभाश जाहीर झाल्यानंतर तो परत याच योजनेत गुंतवला जातो व देय लाभांश पर्यायामध्ये तो जेव्हा जाहीर होतो तेव्हा गुंतवणूकदाराला दिला जातो.

फंड  मॅनेजर: 
या योजनेचे गुंतवणुकीचे नियोजन/व्यवस्थापन हे श्री. आनंद रामकृष्णन एप्रिल २००७ पासून व श्री. आर. जानकीरामन फेब्रुवारी २०११ पासून संयुक्तपणे करत आहेत. त्यांना निधी व्यवस्थापन करण्याचा चांगला अनुभव आहे, म्युचुअल फंड उद्योग जगतात हे एक नावाजलेले चांगले फंड मॅनेजर्स म्हणून ओळखले जातात. 

योजनेची मागील कामगिरी:
हि योजना १३ डिसेंबर १९९४ रोजी सुरु झाली. तेव्हा पासून या योजनेतून वार्षिक सरासरी १९.२५चक्रवाढ दराने परतावा मिळालेला आहे. दिनांक ०३/०६/२०१६ रोजी या योजनेची एन.ए.व्ही. रु.४५५.८० एवढी आहे म्हणजेच ज्यांनी या योजनेत सुरुवातीला एक रकमी रु.एक लाख गुंतवले होते त्या गुंतवणुकीचे दिनांक ३/०६/२०१६ रोजी मूल्य रु.४५.५८ लाखा पेक्षा जास्त झालेले आहे. तसेच ज्यांनी या योजनेत सुरुवातीपासून दर महा रु.१००००/- ची गुंतवणूक केलेली आहे त्यांची एकूण गुंवणूक रु.२५.८० लाख एवढी करून झालेली असून दिनांक ०३/०६/२०१६ या गुंतवणुकीचे मूल्य रु.४ कोटी ६० लाख ९३ हजार एवढे झालेले आहे (फक्त २२ वर्षात).

सध्याची कामगिरी:
या योजनेतून गेल्या ३ वर्षात सरासरी २२.५३% वार्षिक दराने उत्पन्न मिळालेले आहे. आजचे तारखेला हि या विभागातील एक अतिशय चांगली योजना आहे.

Basic Details
Fund House:Franklin Templeton Mutual Fund
Launch Date:Sep 29, 1994
Benchmark:Nifty 500
Riskometer:Moderately High
Risk Grade:Below Average
Return Grade:Above Average
Turnover:5%
Type:Open-ended
Investment Details
Return since Launch:19.25%
Minimum Investment (R)5,000
Minimum Addl Investment (R)1,000
Minimum SIP Investment (R)500
Minimum No of Cheques12
Minimum Withdrawal (R)1,000
Minimum Balance (R)-
Exit Load (%)1% for redemption within 365 days
Performance
YTD1-Month3-Month1-Year3-Year5-Year10-Year
Fund4.574.1210.165.1122.5315.6416.16
Nifty 5001.784.7610.072.1113.678.9410.09
Category1.094.1110.582.7818.4611.9912.65
Rank within Category67889382242
Number of funds in category1551551551531386342
As on Jun 03, 2016 Source: valueresearchonline.com

Portfolio Aggregates
FundBenchmarkCategory
Average Mkt Cap (Rs Cr)52,330.45133,146.4345,147.00
Giant (%)53.8058.6145.29
Large (%)19.4920.3024.93
Mid (%)24.1916.8423.12
Small (%)2.524.257.94
Tiny (%)-0.000.34
Value Research Fund Style












योजनेचा आढावा 

Best & Worst PerformanceBest (Period)Worst (Period)
Month36.25  (Dec 03, 1999 - Jan 04, 2000)-28.97  (Sep 24, 08 - Oct 24, 2008)
Quarter74.29  (Mar 09, 2009 - Jun 10, 2009)-39.73  (Feb 22, 00 - May 23, 2000)
Year233.99  (Jan 04, 1999 - Jan 04, 2000)-49.95  (Jan 14, 08 - Jan 13, 2009)
Risk Measures (%)MeanStd DevSharpeSortinoBetaAlpha
Fund21.7015.121.102.130.9310.64
Nifty 50013.7515.990.540.94--
Category18.0816.640.791.361.006.57
Rank within Category2111310510815
Number of funds in category150150150150150150
As on May 31, 2016
Trailing Returns (%)YTD1-Day1-W1-M3-M6-M1-Y3-Y5-Y7-Y10-Y
Fund4.57-0.090.354.1210.164.665.1122.5315.6415.8516.16
Nifty 5001.78-0.060.704.7610.072.942.1113.678.949.3610.09
Category1.090.030.954.1110.581.842.7818.4611.9913.1712.65
Rank within Category611113978891938224102
Number of funds in category155155155155155153153138635542










योजनेचा पोर्टफोलिओ
Concentration & Valuation
Number of Stocks63
Top 10 Stocks (%)38.06
Top 5 Stocks (%)24.11
Top 3 Sectors (%)47.07
Portfolio P/B Ratio2.99
Portfolio P/E Ratio20.38

Top Holdings
CompanySectorPE3Y High3Y Low% Assets
  HDFC BankFinancial23.187.664.237.66
 InfosysTechnology21.278.384.124.36
 ICICI BankFinancial13.927.313.674.12
 Indusind BankFinancial29.274.102.394.10
  Bharti AirtelCommunication26.118.253.513.88
 Yes BankFinancial17.463.870.863.24
 Axis BankFinancial15.512.780.002.73
 Dr. Reddy's LabHealthcare26.935.132.392.70
 Larsen & ToubroDiversified26.752.800.002.66
  Kotak Mahindra BankFinancial40.812.691.452.61
 Tata MotorsAutomobile11.892.420.002.35
 BPCLEnergy9.182.070.002.07
 Cognizant Technology Solutions Corp.Others---1.98
 Ultratech CementConstruction38.272.150.001.87
 Torrent PharmaceuticalsHealthcare13.553.121.721.73
 Amara Raja BatteriesEngineering29.192.561.601.73
 Mahindra & MahindraAutomobile26.182.020.001.69
 Cadila HealthcareHealthcare21.502.071.371.69
 Hero MotocorpAutomobile20.311.800.001.68
 Gujarat Pipavav PortServices32.372.720.911.47
 WiproTechnology15.032.481.411.43
  Sun Pharmaceutical Inds.Healthcare37.682.000.001.37
  United BreweriesFMCG65.121.420.001.33
  HCL TechnologiesTechnology13.661.740.001.29
 MaricoFMCG45.062.081.271.27
   Indicates an increase or decrease or no change in holding since last portfolio 
 Indicates a new holding since last portfolio
As on Apr 30, 2016 Source: valueresearchonline.com

वरील पोर्टफोलिओ पाहिल्यास तुमच्या लक्षात येईलच कि अनेक चांगले शेअर्स  या पोर्टफोलिओ मध्ये आहेत जे भविष्यात उत्तम परतावा देण्याची क्षमता असणारे आहेत.


योजनेतील जोखीम:
ह्या योजनेतील जवळपास १००% रक्कम हि शेअर बाजारात गुंतवली जात असल्यामुळे या योजनेत केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य शेअर बाजारातील चढ उतारा नुसार कमी किंवा जास्त होऊ शकते.  याच कारणामुळे या योजनेत गुंतवणूक करताना दीर्घ मुदतीसाठीच (किमान १० ते २० वर्षे) करावी.  जरी योजनेत केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य बाजार खाली आल्यास कमी झाले तरी काळजी करू नये कारण दीर्घ मुदतीत अशा प्रकारचे योजनेतून उत्तम परतावा (सरासरी १८% ते २२% या दरम्याने) मिळालेला आहे.

या योजनेत गुंतवणूक कोणी करावी:

ज्यांना आपल्या गुंतवणुकीतून संपत्ती निर्माण करावयाची असेल किंवा दीर्घ कालीन जसे कि निवृत्तीपश्चात जीवनासाठी आर्थिक तरतूद करावयाची असेल, भविष्यातील मुलांची शिक्षण, लग्न कार्य इत्यादी कारणासाठी चांगला फंड तयार करावयाचा असेल त्यांनी या योजनेत अवश्य गुंतवणूक करावी, बाजारातील चढ उतारावर मात करण्यासाठी शक्यतो एस.आय.पी. चे माध्यमातून गुंतवणूक करावी, असे केल्याने आपण बाजारातील तेजी तसेच मंदीचे काळात गुंतवणूक करत राहतो ज्यामुळे गुंतवणुकीची सरासरी होते व जास्त युनिट प्राप्त होतात. जर एक रकमी गुंतवणूक करावयाची असेल तर ती किमान १० वर्षांसाठी करावी, तसेच मधल्या काळात जेव्हा जेव्हा शेअर बाजार खाली येईल तेव्हा तेव्हा जास्तीची एक रकमी गुंतवणूक करत राहावे. बाजार खाली आला म्हणून गुंतवणुकीचे मूल्य कमी झाले तर पैसे काढू नयेत उलट अशा वेळी जास्तीची गुंतवणूक करावी म्हणजे पुढल्या तेजीच्या कालखंडात याचा फायदा होईल.

या योजनेत कोणी गुंतवणूक करू नये?

ज्यांना त्यांचे गुंतवणुकीचे मूल्य कमी झाल्यावर रक्तदाब वाढतो, झोप लागत नाही, बैचैन व्हायला होते, शेअर बाजाराची भीती वाटते अशा व्यक्तींनी या योजनेत गुंतवणूक न केलेलीच बरे.

गुंतवणूक केल्यावर काय करावे?
गुंतवणूक करून झाल्यावर उगाचच रोजच्या रोज आपल्या गुंतवणुकीचे मूल्य पहात बसू नये. कधीतरी सहा महिने वर्षाने जेव्हा बाजार (सेन्सेक्स/निफ्टी) वाढलेला असेल तेव्हाच आपल्या गुंतानुकीचे मूल्य पाहावे. वर्षांचा नव्हे तर दशाकांचाच विचार करावा. बाजार खाली आला म्हणून गुंतवणुकीचे मूल्य कमी झाले तर पैसे काढू नयेत उलट अशा वेळी जास्तीची गुंतवणूक करावी म्हणजे पुढल्या तेजीच्या कालखंडात याचा फायदा होईल.

तुम्हाला म्युचुअल फंडाच्या या योजनेत गुंतवणूक करावयाची आहे काय?
जर आपणास प्रथमच म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर खालील तिन्ही फॉर्म आपले संगणकावर उतरवून घ्या, यातील CAN फॉर्म मध्ये तुमची संपूर्ण माहिती भरा आणि मग प्रिंट काढा त्यावर पान क्रमांक ४ वर सही साठी असलेल्या पहिल्या चौकोनात आपली सही करा.  KYC फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती भरा आणि मग प्रिंट काढा, फोटो चिकटवा आणि अर्धी बाहेर व अर्धी फोटोवर अशी एक सही करा, दुसरी सही खाली सहीसाठी चौकोन आहे त्यामध्ये करा, PayEezz Mandate ह्या फॉर्मची प्रिंट काढा, XX (दोन फुल्या केलेल्या) ठिकाणी सही करा. आता सोबत ज्या बँके मार्फत तुम्हाला गुंतवणूक इ. व्यवहार करावयाचे असतील त्या बँकेचा चेक कॅन्सल करून जोडा तसेच तुमच्या PAN कार्ड व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत स्वसाक्षांकित करून जोडा. आता तिन्ही फॉर्म व कागदपत्रे मला खालील पत्त्यावर पाठवून द्या.  यानंतर मला (९४२२४३०३०२) फोन करा. फोनवर आपण चर्चा करून तुम्हाला गुंतवणुकीसाठी योग्य असणारी म्युचुअल फंडाची योजना आपण ठरवू. या नंतर ऑनलाईन एस.आय.पी. किंवा एकरकमी गुंतवणूक म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत आपण करू शकतो, तुम्हाला फक्त तुमच्या बँक खात्यात पैसे शिल्लक ठेवावयास हवेत. हि प्रोसेस एकदाच केल्यावर नंतर कोणतेही कागदपत्रे, चेक, सही वगैरे काहीच लागणार नाही. फॉर्म भरताना तुम्हाला काही मदत हवी असल्यास मला फोन करून विचार.  जर तुम्ही यापूर्वी गुंतवणूक केली असेल व जर तुम्हालाही हि सुविधा हवी असेल तर खालील तिन्ही फॉर्म भरून सोबत बँकेचा कॅन्सल चेक, PAN कार्ड व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत स्वसाक्षांकित करून जोडा. असे केल्याने तुम्हाला एम.एफ. युटीलिटी या प्लॅटफॉर्म च्या सर्व सुविधेचा लाभ घेता येईल, ज्यामध्ये ऑनलाईन गुंतवणूक करणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत पैसे वर्ग करणे, तपशिलात बदल करणे, बँक खात्यात बदल करणे, पत्ता बदलणे आदी साऱ्या गोष्टी ऑनलाईन किंवा मला फोन करूनही करता येतील. नवीन एस.आय.पी. सुरु करता येईल. सर्व गुंतवणुकीसाठी एकच खाते नंबर मिळेल. आणि महत्वाचे म्हणजे सर्व काही पेपरलेस करता येईल.




वरील सर्व फॉर्म व कागदपत्रे खाली पत्त्यावर पोस्ट अथवा कुरिअरने पाठवून द्या:
ठाकूर फायनन्शिअल सर्व्हिसेस 
२७५, मनीषा, आय.सी.आय.सी.आय. बँके शेजारी, कावीळतळी, चिपळूण-४१५६०५ जि. रत्नागिरी.

पुढील सर्व कारवाई आम्ही पूर्ण करून तुमचे रजिस्ट्रेशन झाले कि तुम्हाला इमेलने कळवू. गुंतवणूक करून झाल्यावर लॉगीन आय.डी. व पासवर्ड इमेलने कळवू याचा वापर करून तुम्ही तुमची म्युचुअल फंडातील सर्व गुंतवणूक एकाच ठिकाणी पाहू शकाल, तसेच नवीन गुंतवणूक करणे, पैसे काढणे आदी साऱ्या गोष्टी ऑनलाइन करू शकाल.

आमची मराठी वेबसाईट www.mutualfundmarathi.com अवश्य भेट द्या.

No comments:

Post a Comment