Wednesday, June 8, 2016

Reliance Tax Saver Fund

Reliance Tax Saver Fund - ELSS (TAX SAVER) CATEGORY FUND


ELSS (Tax Savings) या विभागातील हि चांगली कामगिरी करणारी योजना आहे. अश्या प्रकारच्या योजनेत केलेल्या गुंतवणुकीच्या रकमेला आयकर कलम ८०-सी नुसार कर बचतीचा लाभ मिळतो, जास्तीत जास्त रु.१.५० लाखापर्यंत उत्पन्नातून वजावट मिळू शकते. कर बचतीसाठी उपलब्ध असणाऱ्या अन्य कोणत्याही योजनेपेक्षा कमी म्हणजे फक्त ३ वर्षांचा लॉक इन पिरिअड अशा योजनेतील गुंतवणुकीला असतो, म्हणजेच गुंतवणूक केल्या तारखेपासून ३ वर्षांनंतर या योजनेत गुंतवलेले पैसे काढता येतात. जर का तुम्ही अशा प्रकारचे (ELSS) योजनेत सलग ३ वर्षे गुंतवणूक केली तर नंतर पुढे प्रत्येक वर्षी याच योजनेतून पैसे काढून परत याच योजनेत गुंतवून परत कोणतीही नवीन गुंतवणूक न करताही तुम्ही आयकर कलम ८०-सी खालील फायदा घेऊ शकता.  सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे योजनेत मल्टी कॅप योजनेप्रमाणे लार्ज कॅप, मिड कॅप व स्मॉल कॅप अश्या सर्व विभागातील कंपन्यांचे शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते. अशा योजनेत ४०% ते ६०% गुंतवणूक लार्ज कॅप शेअर्समध्ये करण्याचा काळ बहुतांशी योजनेत असतो मात्र रिलायन्स कर बचत योजनेत मात्र लार्ज कॅप मध्ये २५ ते ४०% एवढेच प्रमाण ठेवलेले असून मिड व स्मॉल कॅप शेअर्सचे प्रमाण हे जवळपास ५०% एवढे जास्त आहे त्याच प्रमाणे मल्टी नॅशनल कंपन्यांचे शेअर्समध्ये जवळपास २० ते ३०% प्रमाण आहे. यामुळेच मागील तेजीचे कालखंडात या योजनेतून अतिशय चांगला परतावा गुंताव्नुक्दाराना मिळालेला आहे, मात्र मिड व स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्समध्ये असणाऱ्या जास्त गुंतवणुकीमुळे रिलायन्सच्या योजनेत अन्य ELSS प्रकारातील योजनांपेक्षा जास्त जोखीम सामावलेली आहे आणि म्हणूनच या योजनेत दीर्घ मुदतीत जास्त संपत्ती निर्माण करण्याची ताकद आहे. मात्र ५० पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींनी या योजनेत गुंतवणूक करताना आपली जोखीम स्वीकारण्याची तयारी तपासून व चांगल्या सल्लागाराच सल्ला घेऊनच या योजनेत गुंतवणूक करावी.


योजनेची माहिती:
हि योजना २१ सप्टेंबर २००५ रोजी गुंतवणुकीसाठी खुली झाली. हि योजना सुरु झाल्यानंतर पहिल्या अडीच वर्षातच बाजारात वर्ष २००८ मध्ये मोठा मंदीचा कालखंड आला जो सुमारे सव्वा वर्ष होता यामुळे या मंदीचा फटका या योजनेला सुरुवातीचे काळातच बसला. गेल्या १२ वर्षात मिळालेला वार्षिक चक्रवाढ पद्धतीने मिळालेला परताव्याचा दर १५.१३% एवढा मिळालेला आहे तोही करमुक्त. परताव्यातील अस्थिरता (Volatility) हि तुलनेने फारच जास्त आहे.  अशा योजनेत गुंतवणूक करताना ती १० किंवा अधिक वर्षांचे अधिक मुदतीसाठीच असली पाहिजे. हि योजना ओपन एंड प्रकारातील असल्यामुळे केव्हाही पैसे गुंतवता येतात किंवा काढताही येतात. या योजनेतील गुंतवणुकीचे ०८/०६/२०१६ रोजी एकूण मूल्य रु.४८४१/- कोटी एवढे आहे. सध्या अनेक कंपन्यांचे शेअर्सचा भाव हा त्याच्या उच्चतम पातळीपेक्षा २५% ते ६०% एवढा कमी झालेला आहे. अर्थशास्त्राचा एक नियम आहे ज्याची किंमत वर जाते ती कालांतराने कमी होणारच आणि ज्याची किंमत कमी होते ती कालांतराने वाढणारच. हा नियम चांगल्या कंपन्यांचे शेअर्सचे भावाला लागू पडतो. दुसरे म्हणजे प्रत्येक शेअर तेजीच्या कालखंडामध्ये एक नवीन उच्चतम पातळी निर्माण करतो, त्यानंतर त्याचा भाव खाली येतो व परत पुढच्या मोठ्या तेजीत तो मागची उच्च पातळी ओलांडून नवीन उच्च पातळी तयार करतो. या योजनेत दर महा एस.आय.पी. माध्यमातून नियमित ठराविक रकमेची गुंतवणूक करावी. 

योजनेचे उदिष्ट:



वेगवेगळ्या क्षेत्रातील  अनेक कंपन्यांचे शेअर्स मध्ये मध्ये गुंतवणूक करून गुंतवणुकीत जास्तीत जास्त मूल्य वृद्धी करणे व ज्यांना लाभांश हवा असतो त्यांना नियमितपणे चांगला लाभांश देता यावा हा आहे हे ह्या योजनेचे उदिष्ट आहे. 

गुंतवणुकीचे पर्याय 
म्युचुअल फंडाचे सर्वच खुल्या प्रकारातील योजनेत ग्रोथ, लाभांश हे दोन प्रमुख पर्याय असतात. ग्रोथ पर्यायात गुंतवणुकीचे मूल्य बाजारातील चढ उतारानुसार वाढत असते. लाभांश पर्यायात लाभांश पुनर्गुंतवणूक व लाभांश देय असे दोन पर्याय असतात. लाभांश पुनर्गुंतवणूक मध्ये लाभाश जाहीर झाल्यानंतर तो परत याच योजनेत गुंतवला जातो व देय लाभांश पर्यायामध्ये तो जेव्हा जाहीर होतो तेव्हा गुंतवणूकदाराला दिला जातो.

फंड  मॅनेजर: 
या योजनेचे गुंतवणुकीचे नियोजन/व्यवस्थापन हे श्री. अश्विनीकुमार योजनेच्या सुरुवातीपासून करत आहेत. त्यांना निधी व्यवस्थापन करण्याचा चांगला अनुभव आहे, म्युचुअल फंड उद्योग जगतात हे एक नावाजलेले चांगले फंड मॅनेजर्स म्हणून ओळखले जातात. 

योजनेची मागील कामगिरी:
दिनांक ०८/०६/२०१६ रोजी या योजनेची एन.ए.व्ही. रु.४५.२९ एवढी आहे म्हणजेच ज्यांनी या योजनेत सुरुवातीला (२१/०९/२००५) एक रकमी रु.एक लाख गुंतवले होते त्या गुंतवणुकीचे दिनांक ८/०६/२०१६ रोजी मूल्य रु.४.५२ लाखा पेक्षा जास्त झालेले आहे. तसेच ज्यांनी या योजनेत सुरुवातीपासून दर महा रु.१००००/- ची गुंतवणूक केलेली आहे त्यांची एकूण गुंवणूक रु.१२.९० लाख एवढी करून झालेली असून दिनांक ०८/०६/२०१६ या गुंतवणुकीचे मूल्य रु.३२.०१ लाख एवढे झालेले आहे.

सध्याची कामगिरी:
या योजनेतून गेल्या ३ वर्षात सरासरी २५.८३% वार्षिक दराने उत्पन्न मिळालेले आहे. आजचे तारखेला हि या विभागातील एक  चांगली योजना आहे.

या योजनेबाबत काही महत्वाची आकडेवारी : 
Basic Details
Fund House:Reliance Mutual Fund
Launch Date:Sep 21, 2005
Benchmark:S&P BSE 100
Riskometer:Moderately High
Risk Grade:High
Return Grade:High
Turnover:21%
Type:Open-ended
Investment Details
Return since Launch:15.13%
Minimum Investment (R)500
Minimum Addl Investment (R)500
Minimum SIP Investment (R)1,000
Minimum No of Cheques6
Minimum Withdrawal (R)500
Minimum Balance (R)500
Exit Load (%)0
Performance
YTD1-Month3-Month1-Year3-Year5-Year10-Year
Fund-0.145.3611.741.9325.8316.8216.68
S&P BSE 1003.566.6810.593.1312.408.3911.83
Category2.495.6011.745.4920.5213.0113.47
Rank within Category69523455622
Number of funds in category78808072683424
As on Jun 08, 2016 Source: Valueresearchonline.com

Portfolio
Portfolio Aggregates
FundBenchmarkCategory
Average Mkt Cap (Rs Cr)19,553.36162,436.7642,262.89
Giant (%)25.4072.8844.72
Large (%)20.0622.5718.96
Mid (%)40.224.5528.38
Small (%)14.32-8.49
Tiny (%)--0.65
Value Research Fund Style









योजनेची  कामगिरी 
Best & Worst PerformanceBest (Period)Worst (Period)
Month30.64  (May 11, 09 - Jun 10, 09)-34.31  (May 12, 06 - Jun 13, 06)
Quarter72.48  (Mar 09, 09 - Jun 10, 09)-35.57  (Jan 04, 08 - Apr 04, 08)
Year115.40  (Mar 09, 09 - Mar 11, 10)-53.63  (Dec 12, 07 - Dec 11, 08)
Risk Measures (%)MeanStd DevSharpeSortinoBetaAlpha
Fund24.5623.730.821.501.3210.95
S&P BSE 10012.0015.680.440.83--
Category19.3116.640.861.471.017.75
Rank within Category623331213
Number of funds in category717171717171
As on May 31, 2016 Source: Valueresearchonline.com

Trailing Returns (%)YTD1-Day1-W1-M3-M6-M1-Y3-Y5-Y7-Y10-Y
Fund-0.140.722.875.3611.743.251.9325.8316.8218.0416.68
S&P BSE 1003.560.161.226.6810.596.843.1312.408.399.5411.83
Category2.490.271.405.6011.745.095.4920.5213.0113.9213.47
Rank within Category6942523460556212
Number of funds in category7880808080727268343324
As on Jun 08, 2016 Source: Valueresearchonline.com

योजनेच्या गुंतवणुकीचा तपशील (पोर्टफोलिओ)
Top Holdings
CompanySectorPE3Y High3Y Low% Assets
 TVS Motor Co.Automobile37.2811.723.929.45
  Larsen & ToubroDiversified27.595.690.005.13
 ICICI BankFinancial14.645.040.004.85
 Axis BankFinancial15.524.740.004.74
 State Bank of IndiaFinancial13.326.400.004.50
  ITCFMCG29.244.900.004.42
 Tata SteelMetals0.005.890.004.18
 Honeywell AutomationEngineering58.094.530.933.78
  Jet Airways IndiaServices5.203.480.003.33
 Indian HotelsServices0.003.320.002.88
  SiemensEngineering66.313.951.602.77
 The Ramco CementsConstruction22.873.111.402.35
  Divi's LaboratoriesHealthcare27.153.831.972.17
 Jubilant FoodWorksServices65.632.650.002.13
  Federal Mogul GoetzeAutomobile40.203.431.991.99
 Sundaram-ClaytonAutomobile16.892.330.001.96
 ABBEngineering82.692.841.391.91
 UPLChemicals19.752.000.001.90
 Bharat ForgeAutomobile27.434.161.821.82
 KSB PumpsEngineering30.452.591.511.81
 TrentServices86.443.541.491.53
 BHELEngineering0.003.990.001.40
  CiplaHealthcare25.131.400.001.40
  Aditya Birla NuvoDiversified7.201.370.001.37
 Cummins IndiaEngineering30.142.591.321.34
   Indicates an increase or decrease or no change in holding since last portfolio
 Indicates a new holding since last portfolio
As on Apr 30, 2016 Source: Valueresearchonline.com

वरील पोर्टफोलिओ पाहिल्यास तुमच्या लक्षात येईलच कि अनेक चांगले तुम्हाला माहित असणाऱ्या कंपन्यांचे तसेच काही तुम्हाला माहित नसणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स  या पोर्टफोलिओ मध्ये आहेत जे भविष्यात उत्तम परतावा देण्याची क्षमता असणारे आहेत.

योजनेतील जोखीम:
ह्या योजनेतील जवळपास ८०% ते १००% रक्कम हि शेअर बाजारात गुंतवली जात असल्यामुळे या योजनेत केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य शेअर बाजारातील चढ उतारा नुसार कमी किंवा जास्त होऊ शकते.  याच कारणामुळे या योजनेत गुंतवणूक करताना दीर्घ मुदतीसाठीच (किमान १० ते २० वर्षे) करावी.  जरी योजनेत केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य बाजार खाली आल्यास कमी झाले तरी काळजी करू नये कारण दीर्घ मुदतीत अशा प्रकारचे योजनेतून उत्तम परतावा (सरासरी १८% ते २४% या दरम्याने) मिळालेला आहे.

या योजनेत गुंतवणूक कोणी करावी:
या योजनेत मुख्यत्वेकरून तरुणांनी दीर्घ मुदतीच्या उदिष्ठाच्या पूर्ततेसाठी करावी. ज्यांना आपल्या गुंतवणुकीतून संपत्ती निर्माण करावयाची असेल किंवा दीर्घ कालीन जसे कि निवृत्तीपश्चात जीवनासाठी आर्थिक तरतूद करावयाची असेल, भविष्यातील मुलांची शिक्षण, लग्न कार्य इत्यादी कारणासाठी चांगला फंड तयार करावयाचा असेल त्यांनी या योजनेत अवश्य गुंतवणूक करावी, बाजारातील चढ उतारावर मात करण्यासाठी शक्यतो एस.आय.पी. चे माध्यमातून गुंतवणूक करावी, असे केल्याने आपण बाजारातील तेजी तसेच मंदीचे काळात गुंतवणूक करत राहतो ज्यामुळे गुंतवणुकीची सरासरी होते व जास्त युनिट प्राप्त होतात. जर एक रकमी गुंतवणूक करावयाची असेल तर ती किमान १० ते २० वर्षांसाठी किंवा यापेक्षा जास्त काळासाठी करावी, तसेच मधल्या काळात जेव्हा जेव्हा शेअर बाजार खाली येईल तेव्हा तेव्हा जास्तीची एक रकमी गुंतवणूक करत राहावे. बाजार खाली आला म्हणून गुंतवणुकीचे मूल्य कमी झाले तर पैसे काढू नयेत उलट अशा वेळी जास्तीची गुंतवणूक करावी म्हणजे पुढल्या तेजीच्या कालखंडात याचा फायदा होईल.

या योजनेत कोणी गुंतवणूक करू नये?
ज्यांना त्यांचे गुंतवणुकीचे मूल्य कमी झाल्यावर रक्तदाब वाढतो, झोप लागत नाही, बैचैन व्हायला होते, शेअर बाजाराची भीती वाटते अशा व्यक्तींनी या योजनेत गुंतवणूक न केलेलीच बरे.





गुंतवणूक केल्यावर काय करावे?


गुंतवणूक करून झाल्यावर उगाचच रोजच्या रोज आपल्या गुंतवणुकीचे मूल्य पहात बसू नये. कधीतरी सहा महिने वर्षाने जेव्हा बाजार (सेन्सेक्स/निफ्टी) वाढलेला असेल तेव्हाच आपल्या गुंतानुकीचे मूल्य पाहावे. वर्षांचा नव्हे तर दशाकांचाच विचार करावा. बाजार खाली आला म्हणून गुंतवणुकीचे मूल्य कमी झाले तर पैसे काढू नयेत उलट अशा वेळी जास्तीची गुंतवणूक करावी म्हणजे पुढल्या तेजीच्या कालखंडात याचा फायदा होईल.

तुम्हाला म्युचुअल फंडाच्या या योजनेत गुंतवणूक करावयाची आहे काय?
जर आपणास प्रथमच म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर खालील तिन्ही फॉर्म आपले संगणकावर उतरवून घ्या, यातील CAN फॉर्म मध्ये तुमची संपूर्ण माहिती भरा आणि मग प्रिंट काढा त्यावर पान क्रमांक ४ वर सही साठी असलेल्या पहिल्या चौकोनात आपली सही करा.  KYC फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती भरा आणि मग प्रिंट काढा, फोटो चिकटवा आणि अर्धी बाहेर व अर्धी फोटोवर अशी एक सही करा, दुसरी सही खाली सहीसाठी चौकोन आहे त्यामध्ये करा, PayEezz Mandate ह्या फॉर्मची प्रिंट काढा, XX (दोन फुल्या केलेल्या) ठिकाणी सही करा. आता सोबत ज्या बँके मार्फत तुम्हाला गुंतवणूक इ. व्यवहार करावयाचे असतील त्या बँकेचा चेक कॅन्सल करून जोडा तसेच तुमच्या PAN कार्ड व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत स्वसाक्षांकित करून जोडा. आता तिन्ही फॉर्म व कागदपत्रे मला खालील पत्त्यावर पाठवून द्या.  यानंतर मला (९४२२४३०३०२) फोन करा. फोनवर आपण चर्चा करून तुम्हाला गुंतवणुकीसाठी योग्य असणारी म्युचुअल फंडाची योजना आपण ठरवू. या नंतर ऑनलाईन एस.आय.पी. किंवा एकरकमी गुंतवणूक म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत आपण करू शकतो, तुम्हाला फक्त तुमच्या बँक खात्यात पैसे शिल्लक ठेवावयास हवेत. हि प्रोसेस एकदाच केल्यावर नंतर कोणतेही कागदपत्रे, चेक, सही वगैरे काहीच लागणार नाही. फॉर्म भरताना तुम्हाला काही मदत हवी असल्यास मला फोन करून विचार.  जर तुम्ही यापूर्वी गुंतवणूक केली असेल व जर तुम्हालाही हि सुविधा हवी असेल तर खालील तिन्ही फॉर्म भरून सोबत बँकेचा कॅन्सल चेक, PAN कार्ड व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत स्वसाक्षांकित करून जोडा. असे केल्याने तुम्हाला एम.एफ. युटीलिटी या प्लॅटफॉर्म च्या सर्व सुविधेचा लाभ घेता येईल, ज्यामध्ये ऑनलाईन गुंतवणूक करणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत पैसे वर्ग करणे, तपशिलात बदल करणे, बँक खात्यात बदल करणे, पत्ता बदलणे आदी साऱ्या गोष्टी ऑनलाईन किंवा मला फोन करूनही करता येतील. नवीन एस.आय.पी. सुरु करता येईल. सर्व गुंतवणुकीसाठी एकच खाते नंबर मिळेल. आणि महत्वाचे म्हणजे सर्व काही पेपरलेस करता येईल.


वरील सर्व फॉर्म व कागदपत्रे खाली पत्त्यावर पोस्ट अथवा कुरिअरने पाठवून द्या:
ठाकूर फायनन्शिअल सर्व्हिसेस 
२७५, मनीषा, आय.सी.आय.सी.आय. बँके शेजारी, कावीळतळी, चिपळूण-४१५६०५ जि. रत्नागिरी.

पुढील सर्व कारवाई आम्ही पूर्ण करून तुमचे रजिस्ट्रेशन झाले कि तुम्हाला इमेलने कळवू. गुंतवणूक करून झाल्यावर लॉगीन आय.डी. व पासवर्ड इमेलने कळवू याचा वापर करून तुम्ही तुमची म्युचुअल फंडातील सर्व गुंतवणूक एकाच ठिकाणी पाहू शकाल, तसेच नवीन गुंतवणूक करणे, पैसे काढणे आदी साऱ्या गोष्टी ऑनलाइन करू शकाल.

आमची मराठी वेबसाईट www.mutualfundmarathi.com अवश्य भेट द्या.

No comments:

Post a Comment