Saturday, June 4, 2016

ICICI Prudential Balanced Advantage Fund

ICICI Prudential Balanced Advantage Fund - BALANCED CATEGORY FUND 

संतुलित (Balanced) विभागातील हि एक अतिशय चांगली कामगिरी करणारी योजना आहे.  हि योजना ३० डिसेंबर २००६ रोजी गुंतवणुकीसाठी सुरु झाली, एक सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करणारी योजना आहे. सातत्याने गुंतवणुकीवर कमी जोखीम असूनही उत्तम परतावा या योजनेतून मिळालेला आहे. गेल्या ९ वर्षात मिळालेला वार्षिक चक्रवाढ पद्धतीने मिळालेला परताव्याचा दर ११.०४% एवढा आहे तोही करमुक्त आणि म्हणूनच बँक ठेविला उत्तम पर्याय असे या योजनेला म्हटले तर चूक होणार नाही. परताव्यातील अस्थिरता (Volatility) हि तुलनेने फारच कमी आहे, कारण कोणत्याही संतुलित (Balanced) तुलनेने कमी जोखीम असते.  अशा योजनेत गुंतवणूक करताना ती ५ किंवा अधिक मुदतीसाठीच असली पाहिजे. जी व्यक्ती म्युचुअल फुंड मध्ये प्रथमच गुंतवणूक करणार असेल त्यांनी या योजनेत गुंतवणूक करून सुरुवात करावी व एक वर्ष अनुभव घेतल्यावर समभाग आधारित योजनेत गुंतवणूक करावी असा मी सल्ला देतो. गुंतवणूक निरनिराळ्या क्षेत्रामधील फक्त मोठ्या कंपन्यांचे शेअर्स मध्येच केली जाते. या योजनेत दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करण्याची ताकद आहे.


योजनेची माहिती:
हि योजना संतुलित (Balanced)प्रकारात मोडते. या योजनेचे एक वैशिष्ठ्य असे सांगता येईल कि या योजनेतील निधी साधारण पणे ३०% ते ८०% शेअर्स मध्ये व उर्वरित २०% ते ७०% निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनात गुंतवला जातो व याचे हे व्यवस्थापन रोजच केले जाते, म्हणजेच रोज हेच प्रमाण राखण्याची काळजी घेतली जाते, यामुळे होते काय कि समजा आज बाजार ४% वर गेला व शेअर बाजारातील या योजनेचं गुंतवणुकीचे मूल्य २% वाढले तर हि वाढलेला निधी निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनात वर्ग केला जातो, याउलट जर बाजार खाली आला व योजनेच्या गुंतवणूक निधीचे मूल्य कमी झाले तर निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनातील गुंतवणूक शेअर बाजारात गुंतवली जाते व नेहमी हे प्रमाण ठरलेल्या प्रमाणात ठेवले जाते. हि योजना ओपन एंड प्रकारातील असल्यामुळे केव्हाही पैसे गुंतवता येतात किंवा काढताही येतात. या योजनेतील गुंतवणुकीचे २/६/२०१६ रोजी एकूण मूल्य रु.११८३८ कोटी एवढे आहे, हे गुंतवणूकदारांचे या योजनेवर असलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे. सध्या अनेक कंपन्यांचे शेअर्सचा भाव हा त्याच्या उच्चतम पातळीपेक्षा २५% ते ७५% एवढा कमी झालेला आहे. अर्थशास्त्राचा एक नियम आहे ज्याची किंमत वर जाते ती कालांतराने कमी होणारच आणि ज्याची किंमत कमी होते ती कालांतराने वाढणारच. हा नियम चांगल्या कंपन्यांचे शेअर्सचे भावाला लागू पडतो. दुसरे म्हणजे प्रत्येक शेअर तेजीच्या कालखंडामध्ये एक नवीन उच्चतम पातळी निर्माण करतो, त्यानंतर त्याचा भाव खाली येतो व परत पुढच्या मोठ्या तेजीत तो मागची उच्च पातळी ओलांडून नवीन उच्च पातळी तयार करतो. या योजनेत दर महा एस.आय.पी. माध्यमातून नियमित ठराविक रकमेची गुंतवणूक करावी किंवा एफ.डी. प्रमाणे समजून एकरकमी गुंतवणूक करावी.  या योजनेचे आणखीन एक वैशिष्ठ्य म्हणजे ज्यांनी या योजनेत पूर्वी गुंतवणूक केलेली आहे त्यांना नुकसान न होता फक्त फायदाच झालेला आहे. या योजनेची तुलना बाजारात उपलब्ध असणाऱ्या अन्य संतुलित (Balanced) योजनांशी करू नये कारण या योजनेचे उदिष्ठ कमी जोखीम स्वीकारून स्थिर परतावा देणे हा आहे, यामुळे अन्य संतुलित (Balanced) योजनांपेक्षा या योजनेतून मिळणारे उत्पन्न हे तुलनेने कमीच असते यामुळे ज्यांना कमी जोखीम, चांगला करमुक्त परतावा मिळावा असे वाटते त्यांचेसाठी हि योजना हि गुंतवणुकीची उत्तम संधी आहे.


योजनेचे उदिष्ट:

वेगवेगळ्या क्षेत्रातील  अनेक कंपन्यांचे शेअर्स मध्ये व बॉंडस, अल्प व दीर्घ मुदतीचे कर्ज रोखे, व मनी मार्केट मध्ये गुंतवणूक करून गुंतवणुकीत जास्तीत जास्त मूल्य वृद्धी करणे हे ह्या योजनेचे उदिष्ट आहे.

फंड  मॅनेजर: 
या योजनेचे गुंतवणुकीचे नियोजन/व्यवस्थापन हे श्री. अश्विन जैन, ऑक्टोबर २०१४ पासून, श्री. मनीष भांतीय नोव्हेंबर २००९ पासून, श्री. मनीष गुणवाणी जानेवारी २०१२ पासून व श्री. राजक चांडक सप्टेंबर २०१५ पासून असे चौघे मिळून करत असून त्यांना निधी व्यवस्थापन करण्याचा चांगला अनुभव आहे, म्युचुअल फंड उद्योग जगतात हे एक नावाजलेले चांगले फंड मॅनेजर्स म्हणून ओळखले जातात. 

योजनेची मागील कामगिरी:
हि योजना ३० डिसेंबर २००६ रोजी सुरु झाली. तेव्हा पासून या योजनेतून वार्षिक सरासरी ११.०४चक्रवाढ दराने परतावा मिळालेला आहे. दिनांक ०२/०६/२०१६ रोजी या योजनेची एन.ए.व्ही. रु.२६.८६ एवढी आहे म्हणजेच ज्यांनी या योजनेत सुरुवातीला एक रकमी रु.एक लाख गुंतवले होते त्या गुंतवणुकीचे दिनांक २/०६/२०१६ रोजी मूल्य रु.२.६८ लाखा पेक्षा जास्त झालेले आहे. तसेच ज्यांनी या योजनेत सुरुवातीपासून दर महा रु.१००००/- ची गुंतवणूक केलेली आहे त्यांची एकूण गुंवणूक रु.११.४० लाख एवढी करून झालेली असून दिनांक ०२/०६/२०१६ या गुंतवणुकीचे मूल्य रु.२१ लाख ६५ हजार एवढे झालेले आहे (फक्त ९ वर्षात).

Basic Details
Fund House:ICICI Prudential Mutual Fund
Launch Date:Dec 30, 2006
Benchmark:Crisil Balanced Fund Aggressive
Riskometer:Moderately High
Risk Grade:Low
Return Grade:Average
Turnover:470%
Type:Open-ended
Investment Details
Return since Launch:11.04%
Minimum Investment (R)5,000
Minimum Addl Investment (R)1,000
Minimum SIP Investment (R)-
Minimum No of Cheques-
Minimum Withdrawal (R)500
Minimum Balance (R)5,000
Exit Load (%)1% for redemption within 540 days
Performance
YTD1-Month3-Month1-Year3-Year5-Year10-Year
Fund2.253.158.356.1216.0213.97-
VR Balanced3.404.928.382.1710.298.11-
Category2.282.897.444.5315.8211.68-
Rank within Category47383622348-
Number of funds in category828683775629-
As on Jun 03, 2016 
Source Valueresearchonline.com 


योजनेचा आढावा 
Best & Worst PerformanceBest (Period)Worst (Period)
Month16.85  (May 11, 09 - Jun 10, 09)-25.94  (Sep 24, 08 - Oct 24, 08)
Quarter42.54  (Mar 09, 09 - Jun 10, 09)-28.77  (Jul 28, 08 - Oct 27, 08)
Year62.43  (Mar 09, 09 - Mar 11, 10)-41.22  (Oct 26, 07 - Oct 27, 08)
Risk Measures (%)MeanStd DevSharpeSortinoBetaAlpha
Fund15.3110.171.011.520.776.30
VR Balanced10.1812.350.410.77--
Category15.2311.630.871.500.865.74
Rank within Category365024285031
Number of funds in category626262626262
As on May 31, 2016
Trailing Returns (%)YTD1-Day1-W1-M3-M6-M1-Y3-Y5-Y7-Y10-Y
Fund2.25-0.040.523.158.352.486.1216.0213.9714.13-
VR Balanced3.400.030.644.928.384.272.1710.298.118.32-
Category2.280.030.612.897.443.004.5315.8211.6812.14-
Rank within Category475748383655223489-
Number of funds in category82868686838277562924-
As on Jun 03, 2016Source Valueresearchonline.com 





Concentration & Valuation
Number of Stocks69
Top 10 Holdings (%)29.48
Top 5 Holdings (%)17.86
Top 3 Sectors (%)32.88
Portfolio P/B Ratio2.70
Portfolio P/E Ratio19.44
Top Equity Holdings
CompanySectorPE3Y High3Y Low% Assets
 HDFC BankFinancial23.186.023.055.58
 InfosysTechnology21.274.771.532.70
  ITCFMCG28.793.792.562.56
  ICICI BankFinancial13.925.102.092.46
 Tech MahindraTechnology17.115.481.612.38
 Motherson Sumi SystemsAutomobile28.712.250.922.25
  HCL TechnologiesTechnology13.662.980.672.24
 Coal IndiaEnergy13.672.260.002.19
  CiplaHealthcare24.813.730.302.13
 Axis BankFinancial15.511.910.001.91
 ACCConstruction49.901.930.001.83
  NTPCEnergy11.971.820.001.68
 WiproTechnology15.032.280.001.67
 M&M Financial ServicesFinancial24.201.620.001.62
  Power Grid Corp.Energy13.082.750.001.51
 Divi's LaboratoriesHealthcare27.221.970.401.51
 Larsen & ToubroDiversified26.751.550.601.47
 Bajaj FinservFinancial15.861.960.651.42
  Maruti Suzuki IndiaAutomobile27.131.740.001.27
 Grasim IndustriesDiversified17.052.080.361.23
 LupinHealthcare28.772.750.001.16
  Reliance IndustriesEnergy11.243.620.931.04
  ONGCEnergy12.841.780.001.02
 Bharti AirtelCommunication26.111.780.000.98
  Tata MotorsAutomobile11.891.280.000.93





     Indicates an increase or decrease or no change in holding since last portfolio 
 Indicates a new holding since last portfolio
As on May 31, 2016 Source: Valueresearchonline.com

Top Debt Holdings
CompanyInstrumentCredit Rating1Y Range% Assets
  National Bank Agr. Rur. Devp 90-D 08/08/2016Commercial PaperA1+0.00 - 4.084.08
 8.6% GOI 2028Central Government LoanSOV2.76 - 4.942.94
 7.35% GOI 2024Central Government LoanSOV0.00 - 3.692.29
  Export-Import Bank 91-D 10/08/2016Commercial PaperA1+0.00 - 2.082.08
  8.38% HDFC 2018Bonds/DebenturesAAA0.00 - 1.901.90
 8.08% GOI 2022Central Government LoanSOV0.00 - 1.851.73
  IDBI Bank 2017Certificate of DepositA1+0.00 - 1.401.40
  Kotak Mahindra Bank 2016Term Deposits-0.00 - 1.271.27
  SIDBI 2017Commercial PaperA1+0.00 - 1.201.20
 7.59% GOI 2029GOI SecuritiesSOV0.00 - 4.681.13
 7.88% GOI 2030GOI SecuritiesSOV0.00 - 2.820.98
 8.24% GOI 2033Central Government LoanSOV0.00 - 1.070.95
 7.73% GOI 2034GOI SecuritiesSOV0.00 - 1.420.84
  Kotak Mahindra Bank 2016Certificate of DepositA1+0.00 - 0.840.84
  Bank of Maharashtra 2017Certificate of DepositA1+0.00 - 0.800.80
 8.3% GOI 2042Central Government LoanSOV0.00 - 0.900.66
 7.16% GOI 2023Central Government LoanSOV0.00 - 0.530.50
 10.05% Motilal Oswal Financial 2016DebentureAA0.00 - 0.440.42
  Corporation Bank 2017Certificate of DepositA1+0.00 - 0.400.40
  Corporation Bank 2017Certificate of DepositA1+0.00 - 0.400.40
  State Bank of Hyderabad 2017Certificate of DepositA1+0.00 - 0.400.40
  Corporation Bank 2017Certificate of DepositA1+0.00 - 0.400.40
 CLP Wind Farms (India) 2020Bonds/DebenturesAA0.00 - 0.440.38
 7.68% GOI 2023GOI SecuritiesSOV0.00 - 1.470.34
 7.59% GOI 2026GOI SecuritiesSOV0.00 - 2.120.32

   Indicates an increase or decrease or no change in holding since last portfolio
 Indicates a new holding since last portfolio
As on May 31, 2016 Source: Valueresearchonline.com

वरील पोर्टफोलिओ पाहिल्यास तुमच्या लक्षात येईलच कि अनेक चांगल्या कंपन्यांचे शेअर्स  या पोर्टफोलिओ मध्ये आहेत जे भविष्यात उत्तम परतावा देण्याची क्षमता असणारे आहेत, तसेच डेब्ट पोर्टफोलिओ मध्ये सरकारी रोखे व उच्च श्रेणीचे कर्ज रोख्यांचा समावेश आहे.

सध्याची कामगिरी:
या योजनेतून गेल्या ३ वर्षात सरासरी १६.०२% वार्षिक दराने उत्पन्न मिळालेले आहे, मात्र याच काळात VR Balanced Index परतावा १०.२९% होता. आजचे तारखेला हि या विभागातील एक चांगली योजना आहे.
योजनेतील जोखीम:
ह्या योजनेतील ३०% ते ८०% रक्कम हि शेअर बाजारात  गुंतवली जात असल्यामुळे या योजनेत केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य शेअर बाजारातील मधील चढ उतारा नुसार कमी किंवा जास्त होऊ शकते. तसेच उर्वरित गुंतवणूक कि कायम उत्पन्न साधनात गुंतवली जाते याचे व्यवस्थापन रोजचे रोजच केले जाते यामुळेच या योजनेतील जोखीम तुलनेने कमी होते. याच कारणामुळे या योजनेत गुंतवणूक करताना दीर्घ मुदतीसाठीच (किमान ३ ते ५ वर्षे) करावी.  जरी योजनेत केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य बाजार खाली आल्यास कमी झाले तरी काळजी करू नये कारण दीर्घ मुदतीत अशा प्रकारचे योजनेतून उत्तम परतावा (सरासरी ११% ते १५% या दरम्याने) मिळालेला आहे. अशा योजनेतून काही वेळा सलग ३ वर्षात १५%  पेक्षाही जास्त परतावा मिळू शकतो मात्र अश्या प्रकारे जेव्हा तो मिळतो तेव्हा गुंतवणुकीतील पैसे काढून सुरक्षित करणे इष्ट होते, कारण जेव्हा इतका परतावा मिळतो तेव्हा समजावे कि नजीकचे काळात बाजार खाली येणार आहे, मात्र असे काढलेले पैसे बाजूला शक्यतो लिक्विड फंडात ठेवावेत व मार्केट परत २०% ने (मिड कॅप) खाली आले कि परत गुंतवणूक करावी.
या योजनेत गुंतवणूक कोणी करावी:
ज्यांना कमीत कमी जोखम पत्करून चांगला व करमुक्त लाभ मिळावा असे वाटते, शेअर तेजीचे कालखंडात शेअर बाजारातील जास्तीचा फायदा मिळावा व मंदीचे काळात निश्चित उत्पन्न साधनातील गुंतवणुकीचा लाभ मिळावा असे वाटते त्यांनी या योजनेत गुंतवणूक करावी. तसेच ज्या व्यक्ती म्युचुअल फंडात प्रथमच गुंतवणूक करणार असतील त्यांनी या योजनेत गुंतवणूक करून त्यांची गुंतवणुकीची सुरुवात करावी म्हणजे बाजारातील जोखमीचा थोडा अंदाज येईल, किमान सहा महिने ते एक वर्ष या योजनेतील गुंतवणुकीचा अनुभव घेऊन झाल्यावर बाजारातील अन्य जास्त जोखमीचे योजनेत गुंतवणूक करावी. आणि बाजारातील चढ उतारावर मात करण्यासाठी शक्यतो एस.आय.पी. चे माध्यमातून गुंतवणूक करावी, असे केल्याने आपण बाजारातील तेजी तसेच मंदीचे काळात गुंतवणूक करत राहतो ज्यामुळे गुंतवणुकीची सरासरी होते व जास्त युनिट प्राप्त होतात. मात्र प्रथमच म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी सुरुवात मिड कॅप योजनेने करू नये. तेजीचे काळात शेअर बाजार तुमच्या गुंतवणुकीवर जास्त परतावा देईल व मंदीचे काळात निश्चित उत्पन्न साधनातील गुंतवणुक तुम्हाला नुकसान होण्यापासून रोखून धरेल. या योजनेत तुम्ही ११% ते १५% एवढा परतावा मिळवू शकता.
या योजनेत कोणी गुंतवणूक करू नये?
ज्यांना त्यांचे गुंतवणुकीचे मूल्य थोडे जरी कमी झाले तरी रक्तदाब वाढतो, झोप लागत नाही, बैचैन व्हायला होते, शेअर बाजाराची भीती वाटते अशा व्यक्तींनी या योजनेत गुंतवणूक न केलेलीच बरे.
गुंतवणूक केल्यावर काय करावे?
गुंतवणूक करून झाल्यावर उगाचच रोजच्या रोज आपल्या गुंतवणुकीचे मूल्य पहात बसू नये. कधीतरी सहा महिने वर्षाने जेव्हा बाजार (सेन्सेक्स/निफ्टी) वाढलेला असेल तेव्हाच आपल्या गुंतानुकीचे मूल्य पाहावे. वर्षांचा नव्हे तर दश्कांचाच विचार करावा.

तुम्हाला म्युचुअल फंडाच्या या योजनेत गुंतवणूक करावयाची आहे काय?
  
जर आपणास प्रथमच म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर खालील तिन्ही फॉर्म आपले संगणकावर उतरवून घ्या, यातील CAN फॉर्म मध्ये तुमची संपूर्ण माहिती भरा आणि मग प्रिंट काढा त्यावर पान क्रमांक ४ वर सही साठी असलेल्या पहिल्या चौकोनात आपली सही करा. KYC फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती भरा आणि मग प्रिंट काढा, फोटो चिकटवा आणि अर्धी बाहेर व अर्धी फोटोवर अशी एक सही करा, दुसरी सही खाली सहीसाठी चौकोन आहे त्यामध्ये करा, PayEezz Mandate ह्या फॉर्मची प्रिंट काढा, XX (दोन फुल्या केलेल्या) ठिकाणी सही करा. आता सोबत ज्या बँके मार्फत तुम्हाला गुंतवणूक इ. व्यवहार करावयाचे असतील त्या बँकेचा चेक कॅन्सल करून जोडा तसेच तुमच्या PAN कार्ड व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत स्वसाक्षांकित करून जोडा. आता तिन्ही फॉर्म व कागदपत्रे मला खालील पत्त्यावर पाठवून द्या.  यानंतर मला (९४२२४३०३०२) फोन करा. फोनवर आपण चर्चा करून तुम्हाला गुंतवणुकीसाठी योग्य असणारी म्युचुअल फंडाची योजना आपण ठरवू. या नंतर ऑनलाईन एस.आय.पी. किंवा एकरकमी गुंतवणूक म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत आपण करू शकतो, तुम्हाला फक्त तुमच्या बँक खात्यात पैसे शिल्लक ठेवावयास हवेत. हि प्रोसेस एकदाच केल्यावर नंतर कोणतेही कागदपत्रे, चेक, सही वगैरे काहीच लागणार नाही. फॉर्म भरताना तुम्हाला काही मदत हवी असल्यास मला फोन करून विचार.  जर तुम्ही यापूर्वी गुंतवणूक केली असेल व जर तुम्हालाही हि सुविधा हवी असेल तर खालील तिन्ही फॉर्म भरून सोबत बँकेचा कॅन्सल चेक, PAN कार्ड व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत स्वसाक्षांकित करून जोडा. असे केल्याने तुम्हाला एम.एफ. युटीलिटी या प्लॅटफॉर्म च्या सर्व सुविधेचा लाभ घेता येईल, ज्यामध्ये ऑनलाईन गुंतवणूक करणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत पैसे वर्ग करणे, तपशिलात बदल करणे, बँक खात्यात बदल करणे, पत्ता बदलणे आदी साऱ्या गोष्टी ऑनलाईन किंवा मला फोन करूनही करता येतील. नवीन एस.आय.पी. सुरु करता येईल. सर्व गुंतवणुकीसाठी एकच खाते नंबर मिळेल. आणि महत्वाचे म्हणजे सर्व काही पेपरलेस करता येईल.


वरील सर्व फॉर्म व कागदपत्रे खाली पत्त्यावर पोस्ट अथवा कुरिअरने पाठवून द्या:
ठाकूर फायनन्शिअल सर्व्हिसेस 
२७५, मनीषा, आय.सी.आय.सी.आय. बँके शेजारी, कावीळतळी, चिपळूण-४१५६०५ जि. रत्नागिरी.

पुढील सर्व कारवाई आम्ही पूर्ण करून तुमचे रजिस्ट्रेशन झाले कि तुम्हाला इमेलने कळवू. गुंतवणूक करून झाल्यावर लॉगीन आय.डी. व पासवर्ड इमेलने कळवू याचा वापर करून तुम्ही तुमची म्युचुअल फंडातील सर्व गुंतवणूक एकाच ठिकाणी पाहू शकाल, तसेच नवीन गुंतवणूक करणे, पैसे काढणे आदी साऱ्या गोष्टी ऑनलाइन करू शकाल.

आमची मराठी वेबसाईट www.mutualfundmarathi.com अवश्य भेट द्या.

No comments:

Post a Comment