Tuesday, May 31, 2016

HDFC Top200 Fund

HDFC Top200 FUND - LARGE CAP CATEGORY FUND

लार्ज कॅप विभागातील हि एक अनेक वर्षे सातत्याने उत्तम कामगिरी करणारी एक लोकप्रिय योजना आहे.  हि योजना ३ सप्टेंबर १९९६ रोजी सुरु झाली, एक सातत्यपूर्ण कामगिरी करणारी योजना आहे. सातत्याने गुंतवणुकीवर उत्तम परतावा या योजनेतून मिळालेला आहे. गेल्या दोन वर्षापासून या योजनेची कामगिरी अपेक्षेप्रमाणे चांगली झालेली नसली तरी ह्या योजनेतील पोर्टफोलिओ वर नजर टाकल्यास असे लक्षात येते कि यातील काही मोठ्या कंपन्यांचे शेअर्सचे भाव त्यांचे उच्चतम पातळीपासून बरेच खाली आलेले आहेत त्यामुळे जेव्हा ह्या शेअर्समध्ये तेजी येईल तेव्हा हि योजना अन्य योजनांचे तुलनेत अधिक परतावा देऊ शकेल. सुरुवातीपासूनचे गेल्या २० वर्षात वार्षिक चक्रवाढ पद्धतीने मिळालेला परताव्याचा दर २०.६१% एवढा आहे. परताव्यातील अस्थिरता (Volatility) हि तुलनेने कमी आहे. गुंतवणूक निरनिराळ्या क्षेत्रामधील मोठ्या कंपन्यांचे (पहिल्या दोनशे कंपन्या) शेअर्स मध्ये गुंतवली जात असल्याने तुलनेने जोखीम कमी होते. या योजनेत दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करण्याची ताकद आहे.

योजनेची माहिती:
हि योजना लार्ज कॅप प्रकारात मोडते. हि योजना ओपन एंड प्रकारातील असल्यामुळे केव्हाही पैसे गुंतवता येतात किंवा काढताही येतात. सध्या अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्सचा भाव हा त्याच्या उच्चतम पातळीपेक्षा ३०% ते ६०% एवढा कमी झालेला आहे. अर्थशास्त्राचा एक नियम आहे ज्याची किंमत वर जाते ती कालांतराने कमी होणारच आणि ज्याची किंमत कमी होते ती कालांतराने वाढणारच. हा नियम मोठ्या कंपन्यांचे शेअर्सचे भावाला तंतोतंत लागू पडतो. दुसरे म्हणजे प्रत्येक शेअर तेजीच्या कालखंडामध्ये एक नवीन उच्चतम पातळी निर्माण करतो, त्यानंतर त्याचा भाव खाली येतो व परत पुढच्या मोठ्या तेजीत तो मागची उच्च पातळी ओलांडून नवीन उच्च पातळी तयार करतो. या योजनेत दर महा एस.आय.पी. माध्यमातून नियमित ठराविक रकमेची गुंतवणूक करावी. 

फंड  मॅनेजर: 
या योजनेचे गुंतवणुकीचे नियोजन/व्यवस्थापन हे श्री. प्रशांत जैन हे जानेवारी २०२ पासून करत असून म्युचुअल फंड उद्योग जगतात हे एक उत्तम फंड मॅनेजर म्हणून ओळखले जातात. 

योजनेची मागील कामगिरी:
हि योजना ३ सप्टेंबर १९९६ रोजी सुरु झाली. तेव्हा पासून या योजनेतून वार्षिक सरासरी २०.६१% चक्रवाढ दराने परतावा मिळालेला आहे. दिनांक ३०/०५/२०१६ रोजी या योजनेची एन.ए.व्ही. रु.३२८.९५ एवढी आहे म्हणजेच ज्यांनी या योजनेत सुरुवातीला एक रकमी रु.एक लाख गुंतवले होते त्या गुंतवणुकीचे दिनांक ३०/०५/२०१६ रोजी मूल्य रु.३२.८९ लाखा पेक्षा जास्त झालेले आहे. तसेच ज्यांनी या योजनेत सुरुवातीपासून दर महा रु.५०००/- ची गुंतवणूक केलेली आहे त्यांची एकूण गुंवणूक रु.११.८० लाख एवढी करून झालेली असून दिनांक ३०/०५/२०१६ या गुंतवणुकीचे मूल्य रु.१ कोटी २७ लाख २९ हजार एवढे झालेले आहे.

सध्याची कामगिरी:
या योजनेतून गेल्या ३ वर्षात सरासरी १३.६४% वार्षिक दराने उत्पन्न मिळालेले आहे. गेल्या दोन वर्षापासून या योजनेची कामगिरी अपेक्षेप्रमाणे चांगली झालेली नसली तरी ह्या योजनेतील पोर्टफोलिओ वर नजर टाकल्यास असे लक्षात येते कि यातील काही मोठ्या कंपन्यांचे शेअर्सचे भाव त्यांचे उच्चतम पातळीपासून बरेच खाली आलेले आहेत त्यामुळे जेव्हा ह्या शेअर्समध्ये तेजी येईल तेव्हा हि योजना अन्य योजनांचे तुलनेत अधिक परतावा देऊ शकेल.
योजनेचा आढावा 

Basic Details
Fund House:HDFC Mutual Fund
Launch Date:Sep 03, 1996
Benchmark:S&P BSE 200
Riskometer:Moderately High
Risk Grade:High
Return Grade:Average
Turnover:51%
Type:Open-ended
Investment Details
Return since Launch:20.61%
Minimum Investment (R)5,000
Minimum Addl Investment (R)1,000
Minimum SIP Investment (R)500
Minimum No of Cheques12
Minimum Withdrawal (R)500
Minimum Balance (R)1,000
Exit Load (%)1% for redemption within 365 days
 Performance
YTD1-Month3-Month1-Year3-Year5-Year10-Year
Fund1.563.5921.93-3.6713.649.8213.84
S&P BSE 2002.093.8117.01-2.3811.958.759.96
Category2.483.7416.61-2.1113.169.8510.37
Rank within Category12299211053273
Number of funds in category1501511501411306643
Best & Worst PerformanceBest (Period)Worst (Period)
Month33.09  (May 11, 2009 - Jun 10, 2009)-30.45  (Sep 26, 2008 - Oct 27, 2008)
Quarter88.14  (Mar 09, 2009 - Jun 10, 2009)-42.90  (Feb 21, 2000 - May 22, 2000)
Year154.57  (Apr 24, 2003 - Apr 23, 2004)-48.09  (Jan 14, 2008 - Jan 13, 2009)
Risk Measures (%)MeanStd DevSharpeSortinoBetaAlpha
Fund13.9719.790.450.901.232.24
S&P BSE 20012.2015.560.460.80--
Category13.1315.360.520.970.982.75
Rank within Category5127568269
Number of funds in category136136136136136136
Trailing Returns (%)YTD1-Day1-W1-M3-M6-M1-Y3-Y5-Y7-Y10-Y
Fund1.560.356.433.5921.93-0.50-3.6713.649.8213.0413.84
S&P BSE 2002.090.345.273.8117.012.46-2.3811.958.759.969.96
Category2.480.395.363.7416.612.42-2.1113.169.8510.9710.37
Rank within Category12210469921341105327143
Number of funds in category150151151151150146141130665543

Concentration & Valuation
Number of Stocks61
Top 10 Stocks (%)48.92
Top 5 Stocks (%)31.76
Top 3 Sectors (%)59.23
Portfolio P/B Ratio1.68
Portfolio P/E Ratio15.23
Portfolio Aggregates
FundBenchmarkCategory
Average Mkt Cap (Rs Cr)82,112.49139,017.05119,867.59
Giant (%)63.9864.3276.99
Large (%)23.0322.0617.42
Mid (%)12.5713.236.36
Small (%)0.430.391.89
Tiny (%)--0.00





Top Holdings
CompanySectorPE3Y High3Y Low% Assets
  InfosysTechnology20.879.775.877.47
  HDFC BankFinancial23.336.653.036.65
 ICICI BankFinancial13.907.815.336.58
 State Bank of IndiaFinancial12.548.994.505.93
 Larsen & ToubroDiversified26.956.333.765.13
 Maruti Suzuki IndiaAutomobile26.444.900.883.68
 Aurobindo PharmaHealthcare24.713.881.153.61
  ITCFMCG29.116.872.623.39
 Reliance IndustriesEnergy11.316.072.393.35
 Axis BankFinancial14.713.470.633.13
  Tata Motors DVRAutomobile-5.242.592.90
 BPCLEnergy9.033.721.052.80
 Bank of BarodaFinancial0.003.242.042.72
 Tata SteelMetals0.002.740.812.68
  Tata MotorsAutomobile11.722.410.002.41
 HDFCFinancial19.163.792.212.21
  Tata Consultancy ServicesTechnology21.145.190.932.13
 ABBEngineering81.812.140.002.11
 Grasim IndustriesDiversified17.152.000.972.00
 CESCEnergy20.022.381.201.85
  Bharti AirtelCommunication25.612.691.111.79
 Power Grid Corp.Energy13.121.700.691.62
 NTPCEnergy11.871.360.001.33
 Crompton Greaves Consumer ElectricalsCons Durable76.831.230.001.20
 VedantaMetals0.001.630.001.15
 Indicates a new holding since last portfolio
As on May 30, 2016 Source valueresearchonline.com 


या योजनेत गुंतवणूक कोणी करावी:
पुढील सर्व कारवाई आम्ही पूर्ण करून तुमचे रजिस्ट्रेशन झाले कि तुम्हाला इमेलने कळवू. गुंतवणूक करून झाल्यावर लॉगीन आय.डी. व पासवर्ड इमेलने कळवू याचा वापर करून तुम्ही तुमची म्युचुअल फंडातील सर्व गुंतवणूक एकाच ठिकाणी पाहू शकाल, तसेच नवीन गुंतवणूक करणे, पैसे काढणे आदी साऱ्या गोष्टी ऑनलाइन करू शकाल.



वरील पोर्टफोलिओ पाहिल्यास तुमच्या लक्षात येईलच कि अनेक चांगले शेअर्स या पोर्टफोलिओ मध्ये आहेत जे भविष्यात उत्तम परतावा देण्याची क्षमता असणारे आहेत.
योजनेतील जोखीम:

ह्या योजनेतील ८०% ते १००% रक्कम हि शेअर बाजारात गुंतवली जात असल्यामुळे या योजनेत केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य शेअर बाजारातील चढ उतारा नुसार कमी किंवा जास्त होऊ शकते.  याच कारणामुळे या योजनेत गुंतवणूक करताना दीर्घ मुदतीसाठीच (किमान १० ते २० वर्षे) करावी.  जरी योजनेत केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य बाजार खाली आल्यास कमी झाले तरी काळजी करू नये कारण दीर्घ मुदतीत अशा प्रकारचे योजनेतून उत्तम परतावा (सरासरी १८% ते २२% या दरम्याने) मिळालेला आहे.

ज्यांना आपल्या गुंतवणुकीतून संपत्ती निर्माण करावयाची असेल किंवा दीर्घ कालीन जसे कि निवृत्तीपश्चात जीवनासाठी आर्थिक तरतूद करावयाची असेल, भविष्यातील मुलांची शिक्षण, लग्न कार्य इत्यादी कारणासाठी चांगला फंड तयार करावयाचा असेल त्यांनी या योजनेत अवश्य गुंतवणूक करावी, बाजारातील चढ उतारावर मात करण्यासाठी शक्यतो एस.आय.पी. चे माध्यमातून गुंतवणूक करावी, असे केल्याने आपण बाजारातील तेजी तसेच मंदीचे काळात गुंतवणूक करत राहतो ज्यामुळे गुंतवणुकीची सरासरी होते व जास्त युनिट प्राप्त होतात.

या योजनेत कोणी गुंतवणूक करू नये?
ज्यांना त्यांचे गुंतवणुकीचे मूल्य कमी झाल्यावर रक्तदाब वाढतो, झोप लागत नाही, बैचैन व्हायला होते, शेअर बाजाराची भीती वाटते अशा व्यक्तींनी या योजनेत गुंतवणूक न केलेलीच बरे.

गुंतवणूक केल्यावर काय करावे?
गुंतवणूक करून झाल्यावर उगाचच रोजच्या रोज आपल्या गुंतवणुकीचे मूल्य पहात बसू नये. कधीतरी सहा महिने वर्षाने जेव्हा बाजार (सेन्सेक्स/निफ्टी) वाढलेला असेल तेव्हाच आपल्या गुंतानुकीचे मूल्य पाहावे. वर्षांचा नव्हे तर दश्कांचाच विचार करावा.

तुम्हाला म्युचुअल फंडाच्या या योजनेत गुंतवणूक करावयाची आहे काय?
  
जर आपणास प्रथमच म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर खालील तिन्ही फॉर्म आपले संगणकावर उतरवून घ्या, यातील CAN फॉर्म मध्ये तुमची संपूर्ण माहिती भरा आणि मग प्रिंट काढा त्यावर पान क्रमांक ४ वर सही साठी असलेल्या पहिल्या चौकोनात आपली सही करा.  KYC फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती भरा आणि मग प्रिंट काढा, फोटो चिकटवा आणि अर्धी बाहेर व अर्धी फोटोवर अशी एक सही करा, दुसरी सही खाली सहीसाठी चौकोन आहे त्यामध्ये करा, PayEezz Mandate ह्या फॉर्मची प्रिंट काढा, XX (दोन फुल्या केलेल्या) ठिकाणी सही करा. आता सोबत ज्या बँके मार्फत तुम्हाला गुंतवणूक इ. व्यवहार करावयाचे असतील त्या बँकेचा चेक कॅन्सल करून जोडा तसेच तुमच्या PAN कार्ड व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत स्वसाक्षांकित करून जोडा. आता तिन्ही फॉर्म व कागदपत्रे मला खालील पत्त्यावर पाठवून द्या.  यानंतर मला (९४२२४३०३०२) फोन करा. फोनवर आपण चर्चा करून तुम्हाला गुंतवणुकीसाठी योग्य असणारी म्युचुअल फंडाची योजना आपण ठरवू. या नंतर ऑनलाईन एस.आय.पी. किंवा एकरकमी गुंतवणूक म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत आपण करू शकतो, तुम्हाला फक्त तुमच्या बँक खात्यात पैसे शिल्लक ठेवावयास हवेत. हि प्रोसेस एकदाच केल्यावर नंतर कोणतेही कागदपत्रे, चेक, सही वगैरे काहीच लागणार नाही. फॉर्म भरताना तुम्हाला काही मदत हवी असल्यास मला फोन करून विचार.  जर तुम्ही यापूर्वी गुंतवणूक केली असेल व जर तुम्हालाही हि सुविधा हवी असेल तर खालील तिन्ही फॉर्म भरून सोबत बँकेचा कॅन्सल चेक, PAN कार्ड व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत स्वसाक्षांकित करून जोडा. असे केल्याने तुम्हाला एम.एफ. युटीलिटी या प्लॅटफॉर्म च्या सर्व सुविधेचा लाभ घेता येईल, ज्यामध्ये ऑनलाईन गुंतवणूक करणे, पैसे काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत पैसे वर्ग करणे, तपशिलात बदल करणे, बँक खात्यात बदल करणे, पत्ता बदलणे आदी साऱ्या गोष्टी ऑनलाईन किंवा मला फोन करूनही करता येतील. नवीन एस.आय.पी. सुरु करता येईल. सर्व गुंतवणुकीसाठी एकच खाते नंबर मिळेल. आणि महत्वाचे म्हणजे सर्व काही पेपरलेस करता येईल.




वरील सर्व फॉर्म व कागदपत्रे खाली पत्त्यावर पोस्ट अथवा कुरिअरने पाठवून द्या:
ठाकूर फायनन्शिअल सर्व्हिसेस 
२७५, मनीषा, आय.सी.आय.सी.आय. बँके शेजारी, कावीळतळी, चिपळूण-४१५६०५ जि. रत्नागिरी.


आमची मराठी वेबसाईट www.mutualfundmarathi.com अवश्य भेट द्या.