Wednesday, May 18, 2016

म्युचुअल फंड गुंतवणुकीसाठी एम.एफ.युटीलिटी

आजकाल म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत थेट गुंतवणूक करणे अत्यंत सुलभ झालेले आहे. जर तुम्हाला गुंतवणूक करण्यापूर्वी म्युचुअल फंडाबाबत जाणून घ्यावयाचे असेल तर तुम्ही माझे संकेतस्थळ म्युचुअल फंड मराठी डॉट कॉम  वर जाऊन म्युचुअल फंडाबाबत सर्व काही मराठी भाषेत वाचून व समजून घेऊ शकता.  म्युचुअल फंड  या विभागात म्युचुअल फंडाची जास्तीत जास्त माहिती मी सोप्या व नेहमीच्या वापरातील मराठी भाषेत विविध लेखांचे माध्यमातून दिली आहे. हि माहिती वाचल्यावर तुम्ही म्युचुअल फंडाबाबत आवश्यक ती माहिती मिळवू शकता.

गुंतवणूक या विभागात गुंतवणूक कशी करावी याबाबत चे लेख लिहिलेले आहेत.MF Utility Platform: 

आम्ही अँफी च्या एम.एफ.युटीलिटी प्लॅटफॉर्म सोबत सलग्न झालेलो असून आम्ही आपणास लॉगीन सुविधा देतो, येथे एकदाच एक CAN Registration Form हा फॉर्म भरून द्यावा लागतो, यासोबत पे इझी मँडेट फॉर्म भरून देता येतो याचा महत्वाचा फायदा म्हणजे आपण केव्हाही कोणत्याही म्युचुअल फंडाचे योजनेत चेक न देता किंवा बँकेतून पैसे ट्रान्स्फर न करताही गुंतवणूक करू शकता अशा वेळी आपण जेवढे लिमिट दिले आहे तितक्या रकमेची गुंतवणुकीची सूचना आमचे मार्फत देऊ शकता, आम्ही ती एम.एफ.युटीलिटी ला ऑनलाईन देऊ, आपल्या बँक खात्यातून पैसे वळते होतील व हव्या त्या म्युचुअल फंड योजनेत गुंतवले जातील.  येथे आपण एकाच फॉर्म चा वापर करून ५ वेगवेळ्या योजनेत गुंतवणूक करू शकता अथवा ५ वेगवेळ्या योजनेतून पैसे काढू शकता.  सर्वच म्युचुअल फंडातील आपला तपशील, बँक बदल इ. गोष्टी एकाच फॉर्म व्दारे करू शकता.  ५ वेगवेळ्या योजनेत स्वीच, एस.आय.पी., एस.डब्ल्यू.पी. इ. सूचना एकाच फॉर्म मध्ये देऊ शकता. 

एम.एफ.युटीलिटी सोबत वापरण्यासाठी विविध फॉर्म्स खाली देत आहोत.


१) म्युचुअल फंडात प्रथमच गुंतवणूक करणार्यांसाठी:

कॉमन रजिस्ट्रेशन फॉर्म   -  या फॉर्म चा वापर करून आपण एकदाच एम.एफ.युटीलिटी सोबत जोडले जाता, यामुळे आपणास एकाच फॉर्म चा वापर करून विविध म्युचुअल फंडांच्या विविध योजनांमध्ये गुनातावणूक करता येते. या फॉर्म चा वापर ज्यांनी पूर्वी म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक केली आहे त्यांनी तसेच जे प्रथमच गुंतवणूक करणार आहेत अशा सर्वांसाठी हा फॉर्म आवश्यक आहे. हा फॉर्म एडीट करता येणारा असल्यामुळे आपण हा आपल्या संगणकावरच भरा व नंतर त्याची प्रिंट काढून त्यावर सही/सह्या करा.  जर आपणास एकाचे नावाने गुंतवणूक करावयाची असेल तर फक्त तुमची स्वत:ची माहिती भरा, जर आपणास दोन किंवा तीन व्यक्तींचे नावाने गुंतवणूक करावयाची असेल तर त्या सर्वांची माहिती भरा व सर्वांच्या सह्या क्रमवार करा. जर आपण या पूर्वी म्युचुअल फंडात गुंतवणूक केली असेल तर ज्या नावाने/नावानी गुंतवणूक केली असेल तशीच माहिती भरा. भरलेला फॉर्म आमच्याकडे पाठवा. 

जी व्यक्ती प्रथमच म्युचुअल फंडात गुंतवणूक करणार आहे व ज्यांची केवायसी झालेली नाही त्यांनी वरील कॉमन रजिस्ट्रेशन फॉर्म सोबतच के.वाय.सी. फॉर्म भरून, फोटो चिकटवून (त्यावर सही करून) वदुसरी सही खाली सहीसाठी असणारे चौकोनात करून  करून, जोडला पाहिजे.  के.वाय.सी. पुर्तेसाठी सोबत स्व-स्वक्षांकित पॅन कार्ड व पुराव्याची प्रत जोडावी (आधार कार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट, व्होटिंग कार्ड, लाईट बिल, इ. पैकी एकच). याच प्रमाणे नवीन गुंतवणूकदाराने पे इझी मँडेट फॉर्म भरून जोडणे आवश्यक आहे.


२) एकदा का तुम्ही रजिस्ट्रेशन पूर्ण केले कि कोणत्याही म्युचुअल फंडाचे कोणत्याही एका अथवा ५ योजने पर्यंत गुंतवणूक करण्यासाठी कॉमन ट्रॅन्झॅक्शन फॉर्म भरून त्यावर सही करून आमचेकडे पाठवा.


अन्य फॉर्म्स खालीलप्रमाणे तुम्ही वापरू शकता:3) Common Transaction Form for Redemption (in upto 5 different schemes)
सूचना: हा फॉर्म भरून तुम्ही एकाच वेळी पांच वेगवेगळ्या म्युचुअल फंडाचे योजनेत केलेल्या गुंतवणूकीची रक्कम संपूर्ण किंवा हवी तेवढी काढू शकता.

4) Common Transaction Form Fillable for SIP Registration (in upto 5 different schemes)
सूचना: हा फॉर्म भरा प्रिंट काढा सही/सह्या करा व जास्तीत जास्त ५ योजनेत एस.आय.पी. करू शकता.

5) Common Transaction Form for STP (in upto 5 different schemes)
सूचना: जर तुम्ही एक रकमी गुंतवणूक डेब्ट फंड योजनेत केली असेल तर हा फॉर्म भरून देऊन तुम्ही त्या योजनेतून तुम्हाला हव्या त्या दुसऱ्या योजनेत (त्याच फंडाचे) दर महा/त्रैमासिक/वार्षिक तत्वावर वर्ग करण्याची सूचना देऊ शकता, याचा उपयोग एस.आय.पी. सारखाच होतो.

6) Common Transaction Form for SWP (in upto 5 different schemes)
सूचना: जर तुम्ही एक रकमी गुंतवणूक कोणत्याही योजनेत केलेली असेल व त्या योजनेतून जर तुम्हाला नियमित पैसे काढावयाचे असतील तर या फॉर्म चा वापर करावा.

7) Common Transaction Form for Switch Request (in upto 5 different schemes)
सूचना: जर तुम्ही एका योजनेत गुंतवणूक केलेली असेल व जर का ती तुम्हाला दुसऱ्या योजनेत वर्ग करावयाची असेल तर हा फॉर्म वापरा.


सूचना: गुंतवणूक करताना हा फॉर्म भारणे अनिवार्य आहे, माहिती भरा, आवश्यक तेथे टीक मार्क करा.

ठाकूर फायनान्शियल सर्व्हीसेस गुंतवणूकदारांना विक्री पश्यात विविध प्रकारच्या सेवा देते.

१) www.shthakur.com या संकेतस्थळावर गुंतवणूकदारांना  लॉग इन सुविधा दिलेली आहे, याचा वापर करून आपण केलेय सर्वच गुंतवणुकीचा संपूर्ण तपशील एकाच ठिकाणी पाहू शकाल.  यात आपणाला वार्षिक चक्रवाढ दराने किती फायदा/तोटा झाला आहे हे कळून येते.  एकाच ठिकाणी म्युचुअल फंडातील सर्वच गुंतवणुकीचा तपशील पाहता येतो.  आर्थिक नियोजन करण्यासाठी एक मोफत सोफ्टवेअर येथे दिलेले आहे, आपण याचा जरूर वापर करावा.

२) मोबाईल अॅप:  केव्हाही व कोठेही गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे म्युल्यांकन पाहण्यासाठी मोबाईल अॅप आम्ही पूर्णत: मोफत देतो.  याच्या वापराने आपणास आपल्या गुंतवणुकीवर नजर ठेवणे सुलभ होते. 


३) NSE MF Platform: आम्ही एन.एस.सी. च्या म्युचुअल फंड प्लॅटफॉर्म सोबत सलग्न झालेलो असून आम्ही आपणास लॉगीन सुविधा देतो, ज्याचा वापर करून आमचे गुंतवणूकदार पैसे गुंतवणे, काढणे, एका योजनेतून दुसऱ्या योजनेत वर्ग करणे इ. सारे व्यवहार ऑनलाईन करू शकतात.  तसेच नावात बदल, पत्ता बदल, बँक बदली अन्य साऱ्या गोष्टी सुद्धा ऑनलाईन करू शकतात.आमचा पत्ता:Thakur Financial Services,


275, "Manisha", Near ICICI Bank, Kaviltali,
Chiplun-415605, Dist: Ratnagiri.
Tel: 02355-251089 Mobile: 9422430302
Email: tfscontactus@gmail.com

तुम्हाला कोणतीही अधिक माहिती हवी असल्यास संपर्क करा.
No comments:

Post a Comment